MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • सावधान! १ मार्चपासून सिम कार्डशिवाय WhatsApp चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

सावधान! १ मार्चपासून सिम कार्डशिवाय WhatsApp चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

new government rule for WhatsApp:  केंद्र सरकारने 'सिम बाइंडिंग' नावाचा नवीन नियम लागू केला आहे, जो १ मार्चपासून अंमलात येईल. या नियमानुसार, WhatsApp आणि Telegram सारखे मेसेजिंग अ‍ॅप्स फोनमध्ये फिजिकल सिम कार्ड असल्याशिवाय चालणार नाहीत. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 28 2026, 05:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
१ मार्चपासून सिम कार्डशिवाय WhatsApp चालणार नाही
Image Credit : Getty

१ मार्चपासून सिम कार्डशिवाय WhatsApp चालणार नाही

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड न ठेवता फक्त वायफाय (Wi-Fi) वर WhatsApp किंवा इतर मेसेजिंग अ‍ॅप्स वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने 'सिम बाइंडिंग' (Sim Binding) नियमांची अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण केली असून, याची मुदत वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उद्यापासून म्हणजेच १ मार्च २०२६ पासून मेसेजिंग अ‍ॅप्सच्या वापराचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे 'सिम बाइंडिंग' नियम?
Image Credit : Getty

काय आहे 'सिम बाइंडिंग' नियम?

सिम बाइंडिंग ही एक प्रगत सुरक्षा प्रणाली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमचे मेसेजिंग अ‍ॅप (उदा. WhatsApp) आता तुमच्या फोनमधील फिजिकल सिम कार्डशी 'लॉक' केले जाईल.

नवा नियम: ज्या फोनमध्ये तुमचे अधिकृत सिम कार्ड असेल, त्याच फोनवर ते अ‍ॅप चालेल.

परिणाम: जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढून टाकले, तर तुमचे WhatsApp, Telegram किंवा Signal अ‍ॅप काम करणे बंद करेल.

डेस्कटॉप युजर्स: संगणक किंवा लॅपटॉपवर लॉगिन केलेले WhatsApp आता दर ६ तासांनी आपोआप लॉग आउट होईल. 

Related Articles

Related image1
Mahindra BE 07: टाटा हॅरियर EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची नवी इलेक्ट्रिक SUV, 2027 मध्ये होणार लाँच!
Related image2
Nothing Phone 4a: आता नव्या पिंक कलरमध्येही मिळणार, कंपनीने लॉन्चआधीच डिझाइन दाखवलं!
35
या अ‍ॅप्सवर होणार परिणाम
Image Credit : Getty

या अ‍ॅप्सवर होणार परिणाम

केवळ WhatsApp नाही, तर अनेक लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स आता सिम कार्डशिवाय चालणार नाहीत.

WhatsApp, Telegram, Signal

Snapchat, ShareChat

JioChat, Josh, Aratai 

45
सरकारने हा निर्णय का घेतला?
Image Credit : Getty

सरकारने हा निर्णय का घेतला?

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा आणि वाढती सायबर फसवणूक रोखण्यासाठी घेण्यात आला आहे.

हॅकिंगला लगाम: हॅकर्स आता दुसऱ्या डिव्हाइसवरून तुमचा नंबर वापरून फसवणूक करू शकणार नाहीत.

गुन्हेगारांची ओळख: बनावट नंबर वापरून मेसेजिंग अ‍ॅप्स चालवणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पकडणे सोपे होईल.

सुरक्षेशी तडजोड नाही: सरकारने स्पष्ट केले आहे की १२- दिवसांच्या आत कंपन्यांना या नियमांच्या पालनाचा अहवाल द्यावा लागेल, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. 

55
युजर्सनी काय काळजी घ्यावी?
Image Credit : Getty

युजर्सनी काय काळजी घ्यावी?

आता तुम्हाला खात्री करावी लागेल की तुम्ही जो नंबर WhatsApp साठी वापरताय, त्याचे फिजिकल सिम कार्ड (Physical SIM) त्याच मोबाईलमध्ये असणे अनिवार्य आहे. सिम कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकल्यास किंवा फोनमध्ये सिम नसल्यास तुमची चॅटिंग सेवा खंडित होऊ शकते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
UPI Payments : डिजिटल जगात खर्च वाढलाय? या सोप्या टिप्स वापरा आणि पैशांची बचत करा
Recommended image2
Credit Card Debt : 1 लाखाचं बिल, तरीही कर्ज कमी का होत नाही? फक्त मिनिमम ड्यु भरल्याने कर्ज फिटतं का?
Recommended image3
Coin History : नाण्यांच्या कडेला रेषा का असतात माहितीये? शेकडो वर्षांचा रंजक इतिहास
Recommended image4
Upcoming Compact SUVs In India : मार्केटमध्ये येतायेत या 10 नव्या दमदार SUVs; ही लिस्ट एकदा पाहाच
Recommended image5
Nike Vegam Run : भारतीयांसाठी खास; रनिंग-फिटनेसप्रेमींसाठी नायकीचं नवं गिफ्ट; 'वेगम रन' शूज लाँच, किंमत किती?
Related Stories
Recommended image1
Mahindra BE 07: टाटा हॅरियर EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची नवी इलेक्ट्रिक SUV, 2027 मध्ये होणार लाँच!
Recommended image2
Nothing Phone 4a: आता नव्या पिंक कलरमध्येही मिळणार, कंपनीने लॉन्चआधीच डिझाइन दाखवलं!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved