अंबानी परिवाराच्या क्रुझ-पार्टीची धूम, भारतातही Cruise वर होणाऱ्या सोहळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

| Published : Jun 03 2024, 09:59 AM IST / Updated: Jun 03 2024, 10:05 AM IST

cruise ship
अंबानी परिवाराच्या क्रुझ-पार्टीची धूम, भारतातही Cruise वर होणाऱ्या सोहळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अंबानी परिवारातील क्रुझ-पार्टीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच क्रुझ-पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण अंबानी परिवाराच्या क्रुझ पार्टीमुळे भारतात देखील अशाच प्रकारचे फंक्शन होऊ शकतात का? 

Cruise Party Celebration in India : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा जुलै महिन्यात लग्नसोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. तत्पूर्वी अंबानी परिवाराने पहिल्या प्री-वेडिंगनंतर दुसरे ग्रँड प्री-वेडिंगचे आयोजन केले होते. यावेळी प्री-वेडिंग सोहळा चक्क क्रुझवर पार पडला. अशातच इकोनॉमिक्स टाइम्सने उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अंबानी परिवाराने केलेल्या क्रुझ-पार्टीमुळे लग्नसोहळे अथवा अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून भारतात देखील क्रुझ पार्टीसाठीची मागणी वाढली गेली आहे.

भारतातही क्रूझ सेलिब्रेशनची मागणी
कॉर्डेलिया क्रुजचे अध्यक्ष आणि सीईओ जर्गेन बॅलोम यांनी म्हटले की, मला वाटते अंबानी परिवाराच्या क्रुझ पार्टीनंतर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. पण क्रुझवर सेलिब्रेशन करण्याची मागणी वाढली जाऊ शकते. मनोरंजन ते फूड्सच्या उत्तम सुविधांमुळे कॉर्डेलियाच्या माध्यमातून भारतीय लग्नसोहळ्यांसाठी उत्तम सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहोत. कारण क्रुझवर सोहळ्याचे आयोजन करण्याची मागणी आता भारतातील काही परिवारांकडून केली जात आहे.

क्रूझ पार्टीसाठी सर्व सर्वोत्तम सोयी-सुविधा
बॅलोम यांनी पुढे म्हटले की, ज्यावेळी कपल मंडपात जातात तेव्हा आम्ही सुनिश्चित करतो की, मंडपाच्या मागून सूर्यास्त दिसावा. एक क्रूझ तुमची स्वप्नातील लग्नसोहळ्याची इच्छा पूर्ण करते. संगीत आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यासह शाही सिनेमागृह, शेफ, स्पा, सलून, नॉन-स्टॉप मनोरंजन, ड्रोन अशाकाही सर्वोत्तम सुविधा क्रुझवर दिल्या जातात.

क्रूझ पार्टीत मागणीसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या
लोटस एयरो एंटरप्राइजेसच्या व्यवस्थापकीय संचालक आणि भारतातील कोस्टा क्रुझच्या जनरल सेल्स एजेंच नलिनी गुप्ता यांनी म्हटले की, "भारतातील क्रूझ लग्नसोहळ्यांसाठी दिली जाणारी पसंतीमागे काही कारणे असू शकतात. जसे की, आलिशान आयुष्य जगण्याची पद्धत, उत्तम सोयी-सुविधा, उत्तम फूड आणि मनोरंजन अशा सर्वकाही गोष्टींचे पॅकेजसह समुद्रातून दिसणारा सुंदर नजारा देखील फार महत्त्वाचा आहे. याशिवाय अंबानी परिवाराने केलेल्या क्रुझ पार्टीनंतर आता भारतीयांमध्येही अशाच प्रकारचे सेलिब्रेशन करण्याची इच्छा निर्माण होत आहे."

क्रूझसाठी भारतात मागणीत वाढ
थॉमस कुक (भारत) चे अध्यक्ष राजीव काळे यांनी म्हटले की, थॉमस कुकने कोरोना महासंकटाच्या आधीच्या काळातील स्तराच्या तुलनेत 40 टक्के अधिक क्रुझची मागणी वाढली आहे. खरंतर, बर्थ डे पार्टी, बॅचलर पार्टीसह काही खास सोहळ्यांसाठी क्रूझवर पार्टीचे आयोजन केले जाते.

आणखी वाचा : 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीची धूम, पहिला Video आला समोर

45 वर्षाचा हा अभिनेता एकेकाळी धुवायचा भांडी, आज Standup Comedy चा किंग