भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल यांच्यात स्पर्धा सुरू आहे. जिओचा ९९९ रुपयांचा प्लॅन ९८ दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शन देतो. तर, एअरटेलचा ८९९ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांची वैधता आणि दररोज १.५ जीबी डेटा देतो.
भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. या दोन कंपन्यांचे प्लॅन मार्केटमध्ये आले आहेत. त्यामध्ये जीओचा प्लॅन हा ९९९ रुपयांना आणि एअरटेल या कंपनीचा प्लॅनबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.चांगला प्रीपेड प्लॅन समजून घेणं आता खूप गरजेचं झालं आहे.
जिओच्या रिचार्जमध्ये काय मिळणार?
आपल्याला जिओच्या रिचार्जमध्ये काय मिळणार ते आपण समजून घेणार आहोत. या प्लॅनची वैधता हि एकूण ९८ दिवसांची असते. त्यामध्ये आपल्याला दररोज कंपनीकडून २ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ५जीचा डेटा हा अनलिमिटेड देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस दररोज मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला जिओ हॉटस्टारच सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे.
एअरटेलच्या रिचार्जमध्ये काय मिळणार?
एअरटेलच्या रिचार्जमध्ये आपल्याला चांगल्या ऑफर मिळणार आहेत. त्यामध्ये ८९९ रुपयांचा रिचार्ज हा ८४ दिवसांसाठी वैध असणार आहे. यामधून आपल्याला दररोज १.५ जीबी डेटा रिचार्ज मिळणार आहे. यामध्ये आपल्याला अनलिमिटेड कॉल्स आणि १०० एसएमएस दररोज पाठवता येणार आहेत.


