Nail Care घरी नखांची काळजी घेण्यासाठी कोणती मशीन बेस्ट आहे? मॅनिक्युअर-पेडिक्युअर मशीनने खरंच पार्लरसारखा रिझल्ट मिळतो का? ७०० ते २५०० रुपयांमध्ये कोणती नेल ड्रिल मशीन खरेदी करावी? जाणून घ्या.

तुम्ही दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन नखांसाठी हजारो रुपये खर्च करता का? आता हे थांबवा. कारण, बाजारात अशा काही मॅनिक्युअर-पेडिक्युअर मशीन्स आल्या आहेत, ज्या तुम्ही हजार-दोन हजार रुपयांत सहज खरेदी करू शकता. एकदा गुंतवणूक केली की, तुम्ही वर्षानुवर्षे घरच्या घरीच तुमच्या हाता-पायांची सुंदरता जपू शकता. चला तर मग, अशाच काही मशीन्स आणि त्यांच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

AGARO Prima Nail Drill & Polisher

तुम्हाला घरीच मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करण्यासाठी एखादी चांगली मशीन हवी असेल, तर AGARO चा हा एक उत्तम पर्याय आहे. यात वेगवेगळे अटॅचमेंट्स मिळतात, ज्यामुळे नखांना फाईल करणे, त्यांना आकार देणे आणि पॉलिश करणे सोपे जाते. तुम्ही जर पहिल्यांदाच अशी मशीन वापरणार असाल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ॲमेझॉनवर ४४% डिस्काउंटनंतर ही मशीन तुम्हाला २,२४९ रुपयांना मिळेल. 

Beurer MP42UK Electric Nail File

जर तुम्हाला प्रीमियम क्वालिटीची मॅनिक्युअर-पेडिक्युअर मशीन घ्यायची असेल, तर तुम्ही Beurer ची ही मशीन नक्कीच ट्राय करायला हवी. ज्यांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा खराब झालेली किंवा निघालेली असते, त्यांच्यासाठी ही मशीन खूप फायदेशीर आहे. या मशीनच्या मदतीने नखं आणि क्युटिकल्सची प्रोफेशनल ग्रूमिंग करता येते. ही मशीन तुम्ही घरी किंवा पार्लरमध्ये, दोन्ही ठिकाणी वापरू शकता.

BOLT BEE Nail Drill Machine

तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला एक चांगली मशीन हवी असेल, तर BOLT BEE Nail Drill Machine तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नखांना शेप देण्यासाठी, बफिंग आणि पॉलिशिंगसाठी तुम्ही ही मशीन वापरू शकता. फ्लिपकार्टवर ५४% डिस्काउंटनंतर ही फक्त ६८८ रुपयांना मिळत आहे. डिझाइनमध्ये कॉम्पॅक्ट असल्यामुळे तुम्ही प्रवासातही ही मशीन सहज सोबत ठेवू शकता. 

NITYA Manicure Pedicure Machine Full Kit

ही USB वर चालणारी मशीन मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरसाठी अगदी सोपी आहे. नखांची स्वच्छता, त्यांना आकार देणे आणि नेल आर्टसाठी नखं तयार करण्यासाठी तुम्ही या कंपनीची मशीन घेऊ शकता. फ्लिपकार्टवर ६६% डिस्काउंटनंतर ही मशीन तुम्हाला ६८८ रुपयांना मिळेल.