गॅस समजून दुर्लक्ष करू नका, असू शकतात हार्ट अटॅकची 'ही' 6 लक्षणं..
जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हे हृदयरोगानं होतात. अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक कोणताही पूर्वसंकेत न देता येतो. पण खरं तर आपलं शरीर आधीच काही संकेत देत असतं. विशेषतः सकाळी उठल्यावर दिसणारे काही बदल हे मोठ्या आजाराचे सूचक असू शकतात.

ती धोकादायक लक्षणं कोणती आहेत? -
जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हे हृदयरोगानं होतात. अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक कोणताही पूर्वसंकेत न देता येतो. पण खरं तर आपलं शरीर आधीच काही संकेत देत असतं. विशेषतः सकाळी उठल्यावर दिसणारे काही बदल हे मोठ्या आजाराचे सूचक असू शकतात. चला तर मग पाहूया, ती धोकादायक लक्षणं कोणती आहेत.
सहा प्रमुख धोक्याचे इशारे -
जेव्हा हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबतो, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. याला वैद्यकीय भाषेत 'मायोकार्डियल इन्फेक्शन' म्हणतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हृदयाचे स्नायू कायमचे खराब होऊ शकतात आणि मृत्यूचा धोका असतो. डॉक्टरांच्या मते, रक्तदाब आणि रक्तपेशींमधील बदलांमुळे सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. जागे झाल्यानंतर दिसणारी ही आहेत सहा प्रमुख धोक्याची लक्षणं.
छातीत अस्वस्थता -
सकाळी छातीत दाब, घट्टपणा किंवा जळजळ जाणवत असेल, तर ती गॅसची समस्या समजू नका. ही वेदना मान, जबडा, पाठ किंवा हातांमध्ये पसरत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
असामान्य थकवा -
झोपेतून उठल्यानंतरही खूप थकवा जाणवणे किंवा कोणतेही काम करताना खूप दम लागणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख लक्षण आहे. हृदयाची ऑक्सिजनची मागणी वाढल्यावर असा थकवा येतो.
श्वास घेण्यास त्रास -
पुरेशी विश्रांती घेऊनही जागे झाल्यावर थकवा जाणवत असेल, तर ते हार्ट फेल्युअरचे लक्षण असू शकते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. हे लक्षण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते.
सकाळी अंगाला घाम येणे -
विशेषतः कोणतेही श्रम न करता थंड घाम येणे हे चिंतेचे कारण असू शकते. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास शरीर तणावाला अशाप्रकारे प्रतिसाद देतं.
चक्कर येणे -
अचानक चक्कर येणे किंवा डोके गरगरणे हे हृदयाकडून मेंदूकडे होणारा रक्तपुरवठा कमी झाल्याचे लक्षण आहे. छातीत दुखण्यासोबत हे लक्षण दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मळमळ -
अनेकजण सकाळच्या मळमळीला पचनाची समस्या समजतात. पण हृदयाशी संबंधित ताणामुळेही मळमळ होऊ शकते. विशेषतः जेवणानंतरही ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
धोक्यापासून स्वतःचे रक्षण करा -
हार्ट अटॅक म्हणजे नेहमीच छातीत तीव्र वेदना होणं असं नाही. ही छोटी लक्षणं ओळखून तुम्ही स्वतःला मोठ्या धोक्यापासून वाचवू शकता.

