Fall Ceiling Design: लिव्हिंग रूमला लक्झरी लुक देतील या 5 मॉडर्न डिझाइन्स
Fall Ceiling Design आजकाल घरांमध्ये फॉल सीलिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषतः लिव्हिंग रूमच्या छताला फॉल सीलिंग केल्यामुळे घराचा पूर्ण इंटिरियर लुकच बदलून जातो.

कशी असावी फॉल सीलिंग?
Fall Ceiling Design तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल, तर साध्या फॉल्स सीलिंगसोबत LED लाईट्स लावा. यामुळे रूमला एक सॉफ्ट आणि एलिगंट लुक मिळतो. फॉल सीलिंगमुळे छताचा भाग जास्त गरम होत नाही आणि खोलीचं तापमान नियंत्रणात राहतं. सध्या डबल लेअर किंवा बॉक्स पॅटर्नची फॉल सीलिंग खूप ट्रेंडमध्ये आहे. यात LED स्ट्रिप लाईट्स आणि झुंबर लावून तुम्ही सुंदर लुक मिळवू शकता.

झिगझॅग डिझाइन फॉल्स सीलिंग
Fall Ceiling Design तुमच्या ड्रॉईंग रूमला लक्झरी आणि हॉटेलसारखा लुक देण्यासाठी, तुम्ही अशा झिगझॅग डिझाइनची फॉल सीलिंग करू शकता. यात झिगझॅग पॅटर्नमध्ये वॉर्म व्हाईट किंवा ब्लू कलरच्या स्ट्रिप लाईट्स लावा.
बॉक्स डिझाइन फॉल्स सीलिंग
Fall Ceiling Design बॉक्स डिझाइन फॉल्स सीलिंग नेहमीच एक क्लासी लुक देते. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर अशा प्रकारची फॉल सीलिंग करू शकता. यात स्ट्रिप लाईटसोबत काही राऊंड लाईट्स लावल्या आहेत आणि मध्यभागी एक जियोमेट्रिक पॅटर्न बनवला आहे.
राऊंड डिझाइन फॉल्स सीलिंग
Fall Ceiling Design ड्रॉईंग रूम मोठा आणि लक्झरी दिसावा यासाठी राऊंड शेपची फॉल सीलिंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यात आजूबाजूला रेक्टँगल शेपच्या फॉल सीलिंगसोबत मध्यभागी राऊंड सर्कलची डिझाइन केली आहे. यात स्ट्रिप लाईट आणि मध्यभागी झुंबर लावले आहे.
3D पॅटर्न फॉल्स सीलिंग
Fall Ceiling Design आजकाल 3D पॅटर्न फॉल सीलिंगसुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे. ही डिझाइन एकदम थ्री-डायमेंशनल लुक देते, जणू काही आपण आकाशच पाहत आहोत. तुम्ही अशाप्रकारे फ्लोरल किंवा पेटल्स (पाकळ्या) डिझाइनची फॉल सीलिंग करू शकता.

