Tea Tips : चहा बनवताना या 3 चुका करू नका; अन्यथा...
चहा वाईट नाही, पण तो बनवण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? नसेल तर, आपण रोज चहा बनवताना अशा कोणत्या चुका करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते, ते जाणून घेऊयात.

चहा बनवण्याची पद्धतही महत्त्वाची -
बहुतेक लोकांसाठी चहा खूप आवडता असतो. अनेकजण सकाळी उठल्याबरोबर एक कप चहाने दिवसाची सुरुवात करतात. काहींना चहा मिळाला नाही तर त्यांचा दिवस वाया गेल्यासारखा वाटतो. चहा पिणे आरोग्यासाठी वाईट आहे, असे तुम्ही ऐकले असेल. पण चहा वाईट नाही, तर तो बनवण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते, हे तुम्ही कधी ऐकले आहे का? नसेल तर, आपण रोज चहा बनवताना कोणत्या चुका करतो, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते, ते जाणून घेऊयात.
प्लास्टिकची गाळणी (स्ट्र्रेनर) हानिकारक -
अनेकजण प्लास्टिकच्या गाळणीने चहा गाळतात. पण गरम चहामुळे प्लास्टिकमधून हानिकारक रसायने निघतात, जी शरीरात जाऊन नुकसान करतात. त्यामुळे नेहमी स्टीलची गाळणी वापरा. ती आरोग्यासाठी सुरक्षित असते.
चहा पुन्हा पुन्हा गरम करणे टाळा -
अनेकदा पाहुण्यांसाठी किंवा स्वतःसाठी बनवलेला चहा उरल्यास तो पुन्हा गरम केला जातो. पण असे करणे आरोग्यावर वाईट परिणाम करते. हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे चहाची चव तर बिघडतेच, शिवाय त्यातील पोषक तत्वेही नष्ट होतात. यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
आधी दूध टाकल्यास चहाची चव बिघडते -
चहा बनवताना आधी दूध टाकल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. इतकेच नाही, तर यामुळे चहाची खरी चव आणि फायदेही नष्ट होतात. त्यामुळे चहा पावडर, पाणी, आले इत्यादी एकत्र उकळून नंतर दूध घालणे चांगले.

