रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाले, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी होतील?भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी रितिका सजदेह यांना दुसरे अपत्य, मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. यामुळे रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी वेळेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.