- Home
- Sports
- Cricket
- Smriti Mandhana: स्मृती मानधनाने कांगारू गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, एकाच सामन्यात रचले थेट ५ विक्रम!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाने कांगारू गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, एकाच सामन्यात रचले थेट ५ विक्रम!
Smriti Mandhana Record: महिला विश्वचषक २०२५ मध्ये आज भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने ३३० धावा केल्या. भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाने ६६ चेंडूत ८० धावांची खेळी केली. तिने २८ वर्षे जुना विक्रमही मोडला.

विक्रम क्रमांक १- एका कॅलेंडर वर्षात स्मृतीने केल्या १००० धावा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना जेव्हा मैदानात उतरली, तेव्हा तिला एका कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त १७ धावांची गरज होती. मानधनाने षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
विक्रम क्रमांक २- स्मृती मानधनाने मोडला २८ वर्षे जुना विक्रम
स्मृती मानधनापूर्वी एका कॅलेंडर वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. बेलिंडाने १९९७ मध्ये हा विक्रम केला होता.
विक्रम क्रमांक ३- स्मृती मानधनाच्या वनडेमध्ये ५००० धावा पूर्ण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती जगातील ५वी आणि भारतातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या आधी भारताची माजी कर्णधार मिताली राजने वनडेमध्ये ही कामगिरी केली होती.
विक्रम क्रमांक ४- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ५०+ धावा
स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग ५व्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला फलंदाज आहे. याआधी तिने कांगारूंविरुद्ध १२५, ११७, ५८ आणि १०५ धावा केल्या आहेत.
विक्रम क्रमांक ५- स्मृती-प्रतिका जोडीने रचला इतिहास
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी आणखी एक नवीन विक्रम रचला. दोघींनी १५५ धावांची भागीदारी केली. महिला वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाची ही चौथी सर्वात मोठी भागीदारी आहे. या सामन्यात मानधनाने ८० तर प्रतिकने ७५ धावा केल्या.
शतक करण्यामध्ये स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर
भारताची स्मृती मानधना ही दुसरी खेळाडू आहे, जिच्या नावावर वनडेमध्ये १३ शतके आहेत. तिच्यापेक्षा जास्त शतके ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीच्या नावावर आहेत, जिने १५ शतके केली आहेत.

