Kuldeep Yadav Reception Photos : क्रिकेटर कुलदीप यादव आणि त्याची पत्नी वंशिका यांनी १७ मार्चला लखनऊच्या 'द सेंट्रम' हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं. या कार्यक्रमाला खेळापासून राजकारणापर्यंत अनेक दिग्गज आले होते. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही हजेरी लावली.

Kuldeep Yadav Reception Photos : टीम इंडियाचा स्पिनर कुलदीप यादवचं रिसेप्शन मंगळवारी, १७ मार्चला लखनऊच्या 'द सेंट्रम' हॉटेलमध्ये झालं. या कार्यक्रमाला राजकारणासोबतच क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज आले होते. रिसेप्शनमधले कुलदीप आणि त्याच्या पत्नीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात वंशिका पतीवर थोडी नाराज असल्यासारखी दिसतेय. अर्थात, खरं काय आहे, हे तर कुलदीपच सांगू शकेल.

क्रिकेट स्टार्सची हजेरी

कुलदीप यादवच्या रिसेप्शनला अनेक मोठे क्रिकेटपटू आले होते. यामध्ये हेड कोच गौतम गंभीरचाही समावेश होता. गंभीरने कुलदीप आणि वंशिकाशी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. असं म्हटलं जातंय की, व्यस्त वेळापत्रकामुळे तो लग्नाला येऊ शकला नव्हता, त्यामुळे तो खास रिसेप्शनला पोहोचला. गंभीरशिवाय ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, शिखर धवन आणि रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत आले होते.

१४ मार्चला मसूरीमध्ये लग्न

कुलदीप आणि वंशिकाचं लग्न १४ मार्चला उत्तराखंडमधील प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट मसूरीमध्ये झालं होतं. त्यानंतर कुलदीप पत्नी वंशिकासोबत त्याच्या मूळ गावी कानपूरला परतला, जिथे त्यांचं जंगी स्वागत झालं. नंतर १७ मार्चला मित्र आणि जवळच्या लोकांसाठी हे ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही पोहोचले

कुलदीप यादवच्या रिसेप्शनला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही पोहोचले होते. योगी आदित्यनाथ येताच कुलदीपने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर योगींनी या जोडप्याला पुष्पगुच्छ देऊन फोटो काढले आणि दोघांना काहीतरी गिफ्टही दिलं.

सपा प्रमुख अखिलेश यादवही आले

कुलदीप यादव आणि वंशिकाच्या वेडिंग रिसेप्शनला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हजेरी लावली.

कुलदीप-वंशिकाच्या या ग्रँड रिसेप्शनमध्ये काँग्रेस नेते आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला हेसुद्धा दिसले.