- Home
- Sports
- Cricket
- Richa Ghosh: रिचा घोष कोण आहे?, जिच्या फटकेबाजीनं आफ्रिकन गोलंदाजांचे धाबे दणाणले; दिवाळीपूर्वीच धावाची केली आतषबाजी
Richa Ghosh: रिचा घोष कोण आहे?, जिच्या फटकेबाजीनं आफ्रिकन गोलंदाजांचे धाबे दणाणले; दिवाळीपूर्वीच धावाची केली आतषबाजी
India Womens vs South Africa Womens: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. टीम इंडियाने 252 धावांचे लक्ष्य दिले आहे. या धावसंख्येत रिचा घोषने 94 धावांचे योगदान दिले. तिने आफ्रिकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

टीम इंडियाची 'गेमचेंजर' म्हणून ओळखली जाते रिचा घोष
रिचा घोष भारतीय संघाची एक आक्रमक फलंदाज आहे. 28 सप्टेंबर 2003 रोजी पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये जन्मलेली रिचा फक्त 22 वर्षांची आहे.
वयाच्या 16 व्या वर्षीच रिचा घोष टीममध्ये आली होती
जानेवारी 2020 मध्ये, वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रिचा घोषची ICC महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती.
रिचा घोषने टी20 मध्ये कधी पदार्पण केले?
रिचा घोषने 12 फेब्रुवारी 2020 रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात तिने 17 धावा केल्या होत्या.
रिचा घोषने पहिला वनडे सामना कधी खेळला?
रिचा घोषने 21 सप्टेंबर 2021 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात तिने नाबाद 32 धावा केल्या होत्या.
रिचा घोषच्या नावावर वनडेमध्ये 947 धावा
रिचा घोष सध्या टीम इंडियाची विकेटकीपर-फलंदाज आहे. तिने 45 एकदिवसीय सामन्यांमध्ये 99.47 च्या स्ट्राइक रेटने 947 धावा केल्या आहेत.
टी20 मध्ये रिचा घोषच्या नावावर 1067 धावा
रिचा घोषने 67 टी-20 सामन्यांमध्ये 142.45 च्या स्ट्राइक रेटने 1067 धावा केल्या आहेत. तिने 2 कसोटी सामनेही खेळले असून त्यात 151 धावा केल्या आहेत.

