- Home
- Sports
- Cricket
- IND vs PAK: ही आहे पाकिस्तानची सर्वात सुंदर क्रिकेटपटू, नतालिया परवेजबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
IND vs PAK: ही आहे पाकिस्तानची सर्वात सुंदर क्रिकेटपटू, नतालिया परवेजबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
Natalia Parvaiz: महिला विश्वचषक 2025 मध्ये 5 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होत आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या नतालिया परवेझ आणि अमीन फलंदाजी करत आहेत. नतालिया पाकिस्तानच्या सर्वात सुंदर खेळाडूंपैकी एक आहे.

नतालिया परवेझचं काश्मीर कनेक्शन
नतालिया परवेझचा जन्म 25 डिसेंबर 1995 रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) बंदाला येथे झाला. 30 वर्षीय नतालिया उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे.
नतालिया या टीम्ससाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळते
नतालिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त हायर एज्युकेशन कमिशन हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि सुपर वुमन यांसारख्या टीम्ससाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळते.
नतालियाने वनडेमध्ये कधी पदार्पण केलं?
नतालियाने 20 मार्च 2018 रोजी श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला येथे वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात तिने नाबाद 21 धावा केल्या होत्या.
नतालिया परवेझने पहिला T20 सामना कधी खेळला?
T20 सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, नतालिया परवेझने 9 नोव्हेंबर 2017 रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध शारजाहमध्ये आपला पहिला T20 सामना खेळला होता. यात तिने फक्त 1 धाव केली होती.
वनडे सामन्यांमध्ये नतालियाने किती धावा केल्या आहेत?
नतालिया परवेझने 12 वनडे सामन्यांमध्ये 80.72 च्या स्ट्राइक रेटने 222 धावा केल्या आहेत. तिची सर्वोच्च धावसंख्या 73 आहे. तर गोलंदाजीत तिने फक्त 1 विकेट घेतला आहे.
T20 मध्ये नतालिया परवेझने आतापर्यंत 119 धावा केल्या
T20 सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, नतालिया परवेझने 24 सामन्यांमध्ये 15 च्या स्ट्राइक रेटने फक्त 119 धावा केल्या आहेत. तसेच, तिने 6 विकेट्सही घेतल्या आहेत.

