- Home
- Sports
- Cricket
- Pakistani Cricketer Wives : बॉलिवूड नट्यांनाही मागे टाकतील अशा पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या बायका; सलमान आगा ते हसन अली!
Pakistani Cricketer Wives : बॉलिवूड नट्यांनाही मागे टाकतील अशा पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या बायका; सलमान आगा ते हसन अली!
Pakistani Cricketer Wives : आशिया कप 2025 चा अंतिम सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुबईत आहे. यात भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. याच निमित्ताने भेटूया पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सुंदर पत्नींना.

हसन अली आणि त्याच्या दोन मुली
पाकिस्तानचा फास्ट बॉलर हसन अलीच्या पत्नीचं नाव सामिया आरजू आहे. त्यांना हेलेना आणि हेजल नावाच्या दोन मुली आहेत.
सलमान अली आगाची पत्नी सबा मंजर
पाकिस्तानचा सध्याचा कर्णधार सलमान अली आगाच्या पत्नीचं नाव सबा मंजर आहे. सबा व्यवसायाने वकील असून तिने ब्रिटनमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांना सलाह नावाचा एक मुलगा आहे.
शाहीन आफ्रिदीची पत्नी अंशा आफ्रिदी
पाकिस्तानचा स्टार बॉलर शाहीन शाह आफ्रिदी हा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. त्याने शाहिदची मुलगी अंशासोबत लग्न केलं आहे.
हारिस रौफची पत्नी मुजना मसूद
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ अनेकदा स्लेजिंगमुळे वादात असतो. त्याच्या पत्नीचं नाव मुजना मसूद आहे. मुजना एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
मोहम्मद नवाजची पत्नी इज्दिहार
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजच्या पत्नीचं नाव इज्दिहार आहे. ती डायग्नोस्टिक रेडियोग्राफर आहे. सौदी अरेबियात जन्मलेल्या इज्दिहारने 2018 मध्ये नवाजशी लग्न केलं. त्यांना जरियान नावाचा मुलगा आणि एक मुलगी आहे.
तरुण फलंदाज हसन नवाजचं लग्न
पाकिस्तानचा तरुण फलंदाज हसन नवाजचं लग्न 21 जून 2025 रोजी झालं. त्याच्या पत्नीबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.

