Monty Panesar Suggests Ravi Shastri for England Head Coach : २०२२ च्या ॲशेस मालिकेत ४-० ने पराभूत झाल्यानंतर, मॅक्युलमच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडने पहिल्या ११ पैकी १० कसोटी सामन्यांमध्ये 'बॅझबॉल' शैली यशस्वीपणे वापरून विजय मिळवला होता.
Monty Panesar Suggests Ravi Shastri for England Head Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या पुढील प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे नाव सुचवले आहे. ऑस्ट्रेलियाला कसे हरवायचे हे रवी शास्त्रींना चांगलेच माहीत आहे आणि ते ब्रेंडन मॅक्युलम यांचे योग्य उत्तराधिकारी ठरू शकतात, असे पानेसर म्हणाला. मॅक्युलम २०२२ मध्ये इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बनले. आक्रमक 'बॅझबॉल' शैली लागू करूनही, त्यांना इंग्लंडला एकदाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचवता आले नाही. मायदेशात आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या ॲशेस मालिकेतही त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.
२०२२ च्या ॲशेस मालिकेत ४-० ने पराभूत झाल्यानंतर, मॅक्युलमच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंडने पहिल्या ११ पैकी १० कसोटी सामन्यांमध्ये 'बॅझबॉल' शैली यशस्वीपणे वापरून विजय मिळवला होता. तथापि, नंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका जिंकण्यात इंग्लंड अपयशी ठरला आणि त्यांनी खेळलेल्या शेवटच्या ३३ कसोटी सामन्यांपैकी १६ मध्ये पराभव पत्करला.
ॲशेस मालिकेनंतर मॅक्युलम आपले पद गमावतील आणि तसे झाल्यास रवी शास्त्री यांना इंग्लंडचे प्रशिक्षक बनवले पाहिजे, असे पानेसरने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर कसे हरवायचे हे रवी शास्त्रींना चांगलेच माहीत आहे. मानसिक आणि रणनीतिकदृष्ट्या ऑस्ट्रेलियाच्या कमकुवतपणाबद्दल शास्त्रींना स्पष्ट कल्पना आहे. त्यामुळे मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री हेच योग्य पर्याय आहेत, असेही पानेसर म्हणाला.
रवी शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली भारताने २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. भारतीय प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर रवी शास्त्री सध्या समालोचक म्हणून काम करत आहेत.


