जेवणानंतर रोज पान खावे का? कोणते आश्चर्यकारक फायदे होतात? तज्ज्ञ काय म्हणतात?
Amazing Health Benefits of eating Betel Leaf : पूजा कार्यात जास्त वापरली जाणारी विड्याची पाने आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून दोन विड्याची पाने खाल्ल्यास आपल्या आरोग्याला पोषक वातावरण मिळेल.

रोज दोन विड्याची पाने
डॉक्टरकडे जाण्याची गरज भासू नये म्हणून रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. त्याचप्रमाणे, रोज दोन विड्याची पाने चघळल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही, असे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे.
विड्याचे पान
ही पाने आजही आपल्या आजी आणि पणजी चघळताना दिसतात. इतकेच नाही, तर पूर्वीच्या काळी प्रत्येकजण रोज एक विड्याचे पान चघळत असे.
आरोग्याला फायदा
पण सध्या ही पाने खाणाऱ्यांची संख्या खूप कमी झाली आहे. बरेच लोक पानसुपारी असलेला पान मसाला खातात. तो आरोग्यासाठी चांगला नसतो. त्याऐवजी ताजे पान तयार करुन खाल्ले पाहिजे. त्याचा आरोग्यालाही फायदा होतो.
विड्याचे पान चघळा
विड्याच्या पानात चुना, तंबाखू किंवा सुपारी घालून पान तयार केले जाते. यामुळे फारसे फायदे मिळत नाहीत. पण फक्त विड्याचे पान चघळल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. इतकेच नाही तर ते विविध आजार बरे करण्यासही मदत करते.
व्हिटॅमिन सी
विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करते. इतकेच नाही तर त्यात कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. ते खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरताही दूर होते.
कॅल्शियम
ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे, त्यांनी विड्याच्या पानात थोडा चुना लावून खावे. पण रोज विड्याच्या पानात चुना लावून खाणे योग्य नाही. कधीतरीच पानात चुना लावावा. रोज मात्र फक्त विड्याचे पान खावे.
उष्णता कमी होते
बाळंतिणींनी विड्याची पाने खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो. विड्याच्या पानात चिमूटभर चुना घालून खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते. या पानांमधील फायबर पचनक्रिया सुधारते.
सर्दी जाते
लहान मुलांना सर्दी झाल्यास, विड्याच्या पानांचा रस दोन थेंब दुधात घालून पाजल्यास, ही समस्या लगेच दूर होते. यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील वाढते. हे दूध मोठ्यांनी प्यायले तरी चांगलेच आहे.
डोकेदुखीत आरामदायी
तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, विड्याच्या पानांचा रस काढून तो कपाळावर लावून थोडा वेळ मसाज केल्यास या समस्येपासून आराम मिळतो.
भूकही वाढते
सध्याच्या काळात मानसिक समस्या आणि नैराश्य वाढले आहे. अशा लोकांनी दररोज एक विड्याचे पान खाल्ल्यास चांगला परिणाम दिसून येतो. ही पाने खाल्ल्याने मानसिक शांतता मिळते, असे तज्ज्ञ सांगतात. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी रोज दोन विड्याची पाने खाल्ल्यास भूक चांगली लागते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

