Boneless fish : हे आहेत बिनकाट्याचे मासे, जे मुलांच्या बौद्धीक क्षमतेस खूपच पूरक
Boneless fish : बिनकाट्याच्या माशांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी खूप उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे बोनलेस असल्याने मुलेही आवडीने खातात.

Boneless fish : बिनकाट्याचे मासे
नॉन-व्हेजप्रेमी मुलांना चिकन-मटण देतात, पण काट्यांमुळे मासे खायचे टाळतात. मुलांनाही काटे घशात अडकण्याची भीती वाटते. पण काही माशांना काटे नसतात, जे मुलांना सहज देता येतात. मुलेही बिनदिक्कतपणे ते खाऊ शकतात. चला ते प्रकार पाहूया.
माशांमधील पोषक तत्वे...
माशांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे भरपूर असतात. हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी खूप मदत करतात. त्यामुळे मासे नियमित खाल्ले पाहिजे असे आपल्याला आपले आजी-आजोबा नेहमी सांगतात.
काटे कमी असलेले माशांचे प्रकार...
1. ट्यूना फिश : यात फॅट्स कमी आणि प्रथिने, व्हिटॅमिन डी, ओमेगा-3 भरपूर असतात. सॅलड किंवा सँडविचमध्ये वापरता येते. हे चविलाही टेस्टी असतात. 2. डोरी फिश : हे मऊ आणि चविष्ट असते. यात प्रथिने जास्त आणि फॅट्स कमी असतात. लहान मुलांना हे फिश आवडतात.
ग्रुपर फिश
3. ग्रुपर फिश : यात काटे कमी असून मांस जाड आणि मऊ असते. महिलांना हे मासे फार आवडतात. 4. सॅल्मन फिश : यात ओमेगा-3 भरपूर असून मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उत्तम आहे. हे सूप, ग्रिलिंगसाठी वापरता येते.
स्नॅपर फिश
स्नॅपर फिशमध्ये मोठे काटे असतात, जे सहज काढता येतात. रेड आणि व्हाईट स्नॅपर चविष्ट असून त्यात व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस आणि ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असते.
टीप...
मासे खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करा. ताज्या माशांचे डोळे स्वच्छ आणि कल्ले लाल असतात. त्याला दुर्गंध नसतो. अशा माशांचीच खरेदी करा. शिळे मासे चविलाही चांगले नसतात.
चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस, आले आणि लसूण वापरा. हे आरोग्यासाठीही चांगले आहे. मासे तयार करताना जास्त मसाले वापरु नका. त्याने माशांची मुळ चव झाकली जाते. विशेष करुन थोडासा मसाला वापरुन मासे तयार करा. असे मासे मुलांनाही खायला आवडतात.
मासे तयार केले असतील तर सोबत चिकन किंवा मटण करु नका. त्यानेही माशांची चव खराब होते. उलट माशांचे वेगवेगळे प्रकार करा.

