हार्दिक नताशा घटस्फोट - दोन वेळा झाले लग्न आणि आता घटस्फोट, नेमकं काय होत कारण?

| Published : Jul 19 2024, 11:01 AM IST

Hardik pandya divorce

सार

हार्दिक पांड्याने नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. दोघांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अगस्त्यची जबाबदारी दोघांवरही राहील. 

हार्दिक पांड्याने घटस्फोट घेतल्याची माहिती संध्याकाळी इंस्टाग्रामवरून दिली. गुरुवारी रात्री त्या दोघांनी सोशल मीडियावरून पोस्ट करून माहिती दिली आहे. हा निर्णय अनेक जणांना माहित असले तरी चाहत्यांसाठी हे धक्कादायक होते. हार्दिकने सोशल मीडियावर ही पोस्ट टाकायच्या आधी नताशा विमानतळावर दिसून आली होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. नताशाने तिच्या नावातील पांड्या हा शब्द हटवल्यानंतर सर्व गोष्टी घडल्याचे दिसून आले आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावरून ही माहिती दिली. 

अगस्त्यची जबाबदारी आमच्या दोघांची राहील - 
अगस्त्यला सांभाळायची जबाबदारी आमच्या दोघांची राहील असे हार्दिक आणि नताशा या दोघांनी सांगितले आहे. आम्ही त्याला शक्य तितका वेळ देऊन त्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले आहे. त्या दोघांनीही आम्ही दोघे मिळून त्याची जबाबदारी घेत असल्याची माहिती दिली आहे. अगस्त्यचा नताशाने तिच्या घरी गेल्यानंतरच कुत्रासोबतचा फोटो स्टोरीला लावून शेअर केला होता. चार वर्षाच्या संसारातून दोघेही वेगळे झाले आहेत. आपण त्यांच्या लव्हस्टोरीला कुठून सुरुवात झाली ते समजून घेऊयात. 

हार्दिक पांड्या आणि नताशा यांची भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्यावेळी हार्दिक पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाला तिने हजेरी लावल्यानंतर तिच्यात आणि हार्दिकमध्ये काहीतरी चालू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघे एकमेकांना गुपचूप भेटल्याचा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर दोघांनी साखरपुड्याची घोषणा केली, त्यामुळे भारतीय चाहते पूर्णपणे बदलून गेले होते. कोविडच्या काळात दोघांनी लग्न केले, त्यांनी घरी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यानंतर जुलै २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांनी परत उदयपूर येथे लग्न केल्याचे फोटो आणि व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पहिले असतील. 
आणखी वाचा - 
मध्य रेल्वे मार्गावर 20 जुलैला रात्री स्पेशल ब्लॉक, पाहा गाड्यांचे वेळापत्रक
महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबईसाठी हवामान खात्याचा ऑरेंज अ‍ॅलर्ट