सार

Maharashtra Rains : महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवमान खात्याने रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा इशारा दिला होता.

Maharashtra Rains : महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे काही गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. याशिवाय नागरिकांना मुसळधार पावसातून घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. अशातच आज (18 जुलै) सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बसण्यास सुरुवात झाली आहे. हवमानान खात्याने मुंबईत पुढील 48 तास हवामान कसे राहिल याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबईला ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी
मुंबईत पुढील 48 तासात 200-250 मिली मीटरचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. शहराला ऑरेंज अ‍ॅलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. याशिवाय सातत्याने पुढील 36-48 तास मध्यम ते मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने मुंबईतील पावसाचा अंदाज व्यक्त करत पुढे म्हटले की, विकेंडला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि अन्य ठिकाणी उत्तम पावसाचा अंदाज आहे. अशातच वेळोवेळी हवामान खात्याकडून वेळोवेळी नागरिकांना पावसासंदर्भातील अ‍ॅलर्ट जारी केला जाईल असेही सांगणयात आले आहे.

नंदुरबारमध्ये सहा महिन्यांचा बाळाचा मृत्यू
नंदुरबारमध्ये सहा महिन्यांचा बाळाचा ओव्हरफ्लो झालेल्या नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती देताना नंदुबार जिल्ह्याधिकारी दीपक गिरासे यांनी म्हटले की, 16 जुलैला रात्री 11 वाजता मनोज ठाकरे आणि त्याची पत्नी बाळासह शहादा येथे प्रवास करत होते. यावेळी ओव्हरफ्लो झालेल्या नाल्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला होता. अशातच दुचाकीसह ठाकरे यांची पत्नी, बाळ वाहून गेले. यामधील महिलेचा जीव वाचवण्यात आला, दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे. पण बाळाचा जीव वाचवता आला नसून त्याचा मृतदेह सापडला आहे.

आणखी वाचा : 

नाशिकमधील अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या 200 पर्यटकांचा वन विभागाकडून बचाव

कोकणात मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क