MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धमाका, एकाच इनिंगमध्ये मोडले ७ मोठे रेकॉर्ड्स!

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धमाका, एकाच इनिंगमध्ये मोडले ७ मोठे रेकॉर्ड्स!

भारताचा युवा ओपनर अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. अफगाणिस्तानच्या बॉलर्सची धुलाई करत त्याने अवघ्या ३० बॉलमध्ये शतक ठोकलं आणि टी-२० क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम रचला.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 18 2026, 09:10 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
३० बॉलमध्ये रेकॉर्डब्रेक शतक
Image Credit : X/BCCI

३० बॉलमध्ये रेकॉर्डब्रेक शतक

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाचा युवा ओपनर अभिषेक शर्माने अफगाणिस्तानच्या बॉलर्सना अक्षरशः रडवलं. तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये त्याने चौफेर फटकेबाजी केली. अवघ्या ३० बॉलमध्ये शतक पूर्ण करत त्याने भारताकडून सर्वात वेगवान टी-२० शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

या खेळीत त्याने रोहित शर्माचा नऊ वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला. एकूण ३४ बॉल खेळताना या डावखुऱ्या बॅटरने ९ फोर आणि ११ उत्तुंग सिक्सर मारत १०८ रन्स केले. शतक पूर्ण झाल्यावर त्याने पिचवर बसून 'एर्लिंग हालँड' स्टाईलने सेलिब्रेशन केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रोहित शर्माचा ९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
Image Credit : ANI

रोहित शर्माचा ९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

२०१७ मध्ये इंदूरला श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने ३५ बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. अनेक भारतीय बॅटर्सनी प्रयत्न करूनही हा रेकॉर्ड अबाधित होता. पण अरुण जेटली स्टेडियमवर अभिषेक शर्माने हा रेकॉर्ड सहज मोडला. ३० बॉलमध्ये शतक पूर्ण करत त्याने टेस्ट दर्जा असलेल्या देशांविरुद्ध जगातलं सर्वात वेगवान टी-२० शतक झळकावलं. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे तिसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.

36
पॉवरप्लेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड
Image Credit : ANI

पॉवरप्लेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

टॉस हरून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाला अभिषेक शर्माने तुफानी सुरुवात करून दिली. पहिल्या ओव्हरपासूनच त्याने अफगाणिस्तानच्या बॉलर्सची धुलाई सुरू केली. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ ओव्हर्समध्ये अभिषेकने २२ बॉलमध्ये तब्बल ७६ रन्स कुटले. यामुळे मेन्स टी-२० मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक रन्स करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला. त्याने पोर्तुगालच्या कुलदीप घोलियाचा (७४ रन्स) रेकॉर्ड मोडला. तसेच, एका कॅलेंडर वर्षात (२०२६) पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ३७ सिक्सर मारण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड त्याने आणखी भक्कम केला.

46
२० बॉलच्या आत सहावी हाफ सेंचुरी
Image Credit : ANI

२० बॉलच्या आत सहावी हाफ सेंचुरी

या इनिंगमध्ये अभिषेक शर्माने अवघ्या १६ बॉलमध्ये आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. टी-२० क्रिकेटमध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी बॉलमध्ये हाफ सेंचुरी करण्याची अभिषेकची ही सहावी वेळ आहे. जगातल्या कोणत्याही बॅटरला इतक्या वेळा असा कारनामा करता आलेला नाही. याआधी न्यूझीलंडविरुद्ध १४ बॉलमध्ये फिफ्टी मारण्याचा रेकॉर्डही त्याच्याच नावावर आहे. युवराज सिंगच्या (१२ बॉल) विक्रमानंतर अभिषेकचीच बॅट आग ओकत आहे.

56
विराट कोहलीच्या पंक्तीत अभिषेक शर्मा
Image Credit : ANI

विराट कोहलीच्या पंक्तीत अभिषेक शर्मा

टी-२० फॉरमॅटमध्ये ओव्हरऑल अभिषेक शर्माचं हे १० वं शतक आहे. यासह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. आणखी एक शतक मारल्यास तो कोहलीला मागे टाकून भारताकडून पहिल्या नंबरवर पोहोचेल. तसेच या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये ११ सिक्सर मारल्यामुळे या सिरीजमधील त्याच्या एकूण सिक्सरची संख्या २२ वर पोहोचली आहे. एकाच टी-२० सिरीजमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याच्या स्वतःच्याच जुन्या रेकॉर्डची (२०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध २२ सिक्सर) त्याने बरोबरी केली आहे.

66
टीकाकारांना बॅटनेच दिलं सडेतोड उत्तर
Image Credit : BCCI

टीकाकारांना बॅटनेच दिलं सडेतोड उत्तर

या सिरीजपूर्वी सलग ७ इनिंगमध्ये रन्स न झाल्यामुळे अभिषेक शर्मा प्रचंड दबावाखाली होता. त्यातच १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांच्यामुळे ओपनिंगच्या जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन मॅचच्या सिरीजमध्ये (८२, ३९, १०८) त्याने जबरदस्त फॉर्म दाखवत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. विशेषतः तो स्पिन खेळू शकत नाही या टीकेला त्याने रशीद खान आणि मुजीबच्या बॉलिंगवर उत्तुंग सिक्सर मारून चोख उत्तर दिलं.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
क्रिकेट बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने तिन्ही फॉरमॅट खेळू नयेत, टेस्टवर फोकस करावा; रवी शास्त्रींचा सल्ला
Recommended image2
BCCI Selection Committee : अजित आगरकरच्या जागी रमेश पोवारची एन्ट्री; प्रज्ञान ओझा नवा चेअरमन
Recommended image3
MS Dhoni Viral Video : अनंत अंबानींनी धोनीला राईडवर बोलावले, कॅप्टन कूलची रिअ‍ॅक्शन व्हायरल
Recommended image4
Naman Dhir: 'त्याचे शॉट्स हार्दिक पांड्यासारखेच', आकाश चोप्राने केली नमन धीरची स्तुती
Recommended image5
Mohammed Shami: 'शमी पूर्णपणे फिट, त्यानेच विश्रांती मागितली होती', फिटनेसच्या अफवांवर बंगालच्या कोचचं स्पष्टीकरण
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved