- Home
- Special
- AI Impact : २०२६ मध्ये AI मुळे या नोकर्या होतील नाहिशा, तुम्ही या सेक्टरमध्ये काम करत नाहीना!
AI Impact : २०२६ मध्ये AI मुळे या नोकर्या होतील नाहिशा, तुम्ही या सेक्टरमध्ये काम करत नाहीना!
मुंबई - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनने संपूर्ण जगाच्या रोजगार व्यवस्थेला जोरदार धक्का दिला आहे. जगभरातील संशोधक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या अहवालानुसार, २०२६ सालापर्यंत काही पारंपरिक नोकर्या पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

२०२६ पर्यंत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या काही प्रमुख नोकर्या:
डेटा एंट्री ऑपरेटर
AI-पावर्ड ऑटोमेशन टूल्समुळे डेटा एंट्रीसाठी माणसाची गरज जवळपास नाहीशी झाली आहे. अनेक कंपन्या डेटा एआयसह अचूकतेने आणि जलद वेगाने प्रक्रिया करत आहेत.
टेलिकॉलर/कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (बेसिक सेवा)
AI चॅटबॉट्स आणि वॉइस असिस्टंट्स आता कॉल सेंटरमध्ये प्राथमिक शंका आणि सेवा सहज हाताळू शकतात. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर्या कमी होतील.
कॅशियर आणि बँक क्लर्क
डिजिटल पेमेंट्स, UPI, आणि सेल्फ-चेकआउट मशीन यामुळे मॉल्स, बँकांमध्ये कॅशियरची गरज कमी झाली आहे.
प्रूफरीडर आणि बेसिक कंटेंट एडिटर
Grammarly, ChatGPT सारख्या टूल्समुळे व्याकरण सुधारणा व प्राथमिक संपादनासाठी AI वापरला जातो. त्यामुळे प्राथमिक पातळीवरील एडिटिंग जॉब्स कमी होतील. तसेच कॉन्टेंट लिहिणारेही कमी होतील.
फॅक्टरी वर्कर्स (Assembly Line Jobs)
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत AI आणि रोबोटिक्स यामुळे assembly line वर माणसांची गरज कमी होत आहे.
ड्रायव्हर्स (विशेषतः लॉजिस्टिक्स व टॅक्सी सेवा)
सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स, ट्रक्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजी २०२६ नंतर अधिक व्यापक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग जॉब्स कमी होणार आहेत.
बेसिक अकाउंटिंग क्लर्क्स
AI बेस्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर्समुळे चालू आर्थिक व्यवहार, बिले, कर प्रक्रिया यासारखी कामं मशीन्सकडून केली जात आहेत.
भारतात विशेष प्रभाव
भारतात, विशेषतः मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये IT, BPO आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मध्यम आणि लघुउद्योगांमध्येही कामगारांची संख्या कमी करण्याच्या हालचाली AI मुळे होणार आहेत.