थंडीच्या दिवसात कपडे वाळणे फार मुश्किल असते. अशातच कपडे लवकर वाळावेत म्हणून काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
थंडीत कपडे लवकर सुकण्यासाठी पुढे काही टिप्स जाणून घेऊया.
थंडीत ऊन कमी असल्याने घरामध्ये ड्रायर स्टँडवर कपडे वाळत घालू शकता. यावेळी खोलीचे दरवाजे-खिडक्या खुल्या ठेवा.
कपडे धुतल्यानंतर त्यामधील पाणी निघून जाण्यासाठी व्यवस्थितीत पिळा. अथवा वॉशिंग मशीनमध्ये स्पिन मोडचा वापर करा. जेणेकरुन कपडे लवकर वाळले जातील.
जाड कपडे जसे की, स्वेटर किंवा जीन्स लवकर सुकण्यासाठी रुम हिटर किंवा हेअर ड्रायरचा वापर करा. लक्षात ठेवा, कधीच कपडे हिटरवर ठेवू नका.
हलक्या ओलसर कपड्यांवर इस्रीचा वापर करुन ते सुकवू शकता.
Chanakya Niti : या 3 सवयी वेळीच सुधारा, अन्यथा समाजात सतत होईल अपमान
तांदूळ आणि डाळीच्या डब्यात या 5 गोष्टी ठेवा, किडे आणि भुंगे होतील दूर
प्रत्येक समस्येवर औषध आहे रवा, त्यातून बनवा 7 स्वादिष्ट स्नैक्स रेसिपी
कमी पैशात दिसेल शाही!, ₹300 ला खरेदी करा 8 Simple Blouse