- Home
- Mumbai
- गुड न्यूज! विरार ते सुरत प्रवास आता अधिक सोपा; रेल्वेने सुरू केली 'थेट' मेमू सेवा, पाहा नवे वेळापत्रक
गुड न्यूज! विरार ते सुरत प्रवास आता अधिक सोपा; रेल्वेने सुरू केली 'थेट' मेमू सेवा, पाहा नवे वेळापत्रक
Virar-Surat MEMU Train Update : पश्चिम रेल्वेने विरार-सुरत मेमू ट्रेन एकाच टप्प्यात चालवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे प्रवाशांचा संजाण स्थानकावरील खोळंबा संपणार. ३ जानेवारी २०२६ पासून लागू झालेल्या या बदलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

विरार ते सुरत प्रवास आता अधिक सोपा
Virar-Surat MEMU Train Update : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन तुकड्यांमध्ये धावणारी विरार-सुरत मेमू ट्रेन आता थेट एकाच टप्प्यात धावणार आहे. आज म्हणजेच ३ जानेवारी २०२६ पासून या नव्या सुविधेची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रमाची मोठी बचत होणार आहे.
प्रवाशांचा 'संजाण'चा खोळंबा संपला!
यापूर्वी ही रेल्वे सेवा दोन टप्प्यांत चालवली जात होती. प्रवाशांना विरार-संजाण आणि संजाण-सुरत अशा दोन वेगवेगळ्या गाड्यांच्या क्रमांकांमुळे अनेकदा गोंधळाला सामोरे जावे लागत असे. संजाण स्थानकावर गाडी थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. आता थेट सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना एकाच ट्रेनने विनासायास विरार ते सुरत असा २०७ किलोमीटरचा प्रवास करता येईल.
नवे वेळापत्रक एका नजरेत
गाडी क्रमांक,कुठून-कुठे,सुटण्याची वेळ,पोहोचण्याची वेळ
६९१४१,विरार ते सुरत,सकाळी ५:१५,सकाळी १०:३०
६९१४२,सुरत ते विरार,सायंकाळी ५:३०,रात्री ११:३०
प्रवाशांची 'ही' मागणी कायम
थेट सेवा सुरू झाल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला असला, तरी भाड्याबाबत एक मागणी जोर धरत आहे. या गाडीचा प्रवास २०७ किमीचा असल्याने, तिचे तिकीट दर सामान्य पॅसेंजर ट्रेनप्रमाणे असावेत, अशी विनंती प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला करण्यात येत आहे.
थेट सेवेचे फायदे
वेळेची बचत: संजाण स्थानकावरील अनावश्यक थांबा आणि तांत्रिक बदल आता होणार नाहीत.
गोंधळ दूर: नवीन प्रवाशांना आता दोन वेगळ्या रेल्वे क्रमांकांचे टेन्शन राहणार नाही.
व्यापाऱ्यांना दिलासा: विरार आणि सुरत दरम्यान व्यापारानिमित्त प्रवास करणाऱ्यांना या सकाळच्या गाडीचा मोठा फायदा होईल.

