MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Navi Mumbai To Jamnagar Flight Service: नवी मुंबईकरांसाठी खूशखबर! गुजरातला जाणं आता अजून सोपं; 'या' शहरासाठी सुरू होतेय थेट विमानसेवा!

Navi Mumbai To Jamnagar Flight Service: नवी मुंबईकरांसाठी खूशखबर! गुजरातला जाणं आता अजून सोपं; 'या' शहरासाठी सुरू होतेय थेट विमानसेवा!

Navi Mumbai To Jamnagar Flight Service: इंडिगो एअरलाईन्सने नवी मुंबई विमानतळावरून जामनगरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली . २३ एप्रिलपासून सुरू होणारी ही सेवा प्रवाशांचा वेळ वाचवेल, ज्यामुळे दीड तासात गुजरात गाठणे शक्य होईल. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 10 2026, 05:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नवी मुंबईकरांसाठी खूशखबर! गुजरातला जाणं आता अजून सोपं
Image Credit : X

नवी मुंबईकरांसाठी खूशखबर! गुजरातला जाणं आता अजून सोपं

नवी मुंबई: तुम्ही जर व्यवसायानिमित्त किंवा पर्यटनासाठी वारंवार गुजरातला जात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतील विमानतळावरून आता गुजरातच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे उड्डाण झेपावणार आहे. इंडिगो एअरलाईन्सने नवी मुंबई ते जामनगर अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२३ एप्रिलपासून प्रवासाचा नवा श्रीगणेशा!
Image Credit : Asianet News

२३ एप्रिलपासून प्रवासाचा नवा श्रीगणेशा!

जामनगरला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी इंडिगोने हे पाऊल उचलले आहे. २३ एप्रिलपासून ही सेवा नियमितपणे सुरू होईल. विशेष म्हणजे, या नव्या सेवेमुळे प्रवाशांना आता कनेक्टिंग फ्लाईट्सची वाट पाहावी लागणार नाही किंवा दुसऱ्या शहरात उतरून जामनगर गाठावे लागणार नाही. यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. 

35
काय असेल विमानाचे वेळापत्रक?
Image Credit : Getty

काय असेल विमानाचे वेळापत्रक?

इंडिगोच्या ६E-2053 या विमानाने नवी मुंबई ते जामनगर हा प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण होईल. वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

निघण्याची वेळ (नवी मुंबई): दररोज दुपारी ४:०० वाजता.

पोहोचण्याची वेळ (जामनगर): सायंकाळी ५:३० वाजता.

विमानाचा प्रकार: या मार्गावर प्रगत A-320 विमानांद्वारे सेवा दिली जाणार आहे. 

45
गुजरातची 'कनेक्टिव्हिटी' आता अधिक मजबूत!
Image Credit : Asianet News

गुजरातची 'कनेक्टिव्हिटी' आता अधिक मजबूत!

इंडिगोची सेवा सध्या अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि भावनगर या शहरांसाठी आधीच उपलब्ध आहे. आता 'जामनगर' या सहाव्या शहराची भर पडल्याने नवी मुंबई आणि गुजरात दरम्यानचे व्यावसायिक संबंध आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे जामनगरला जाणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे, त्यांच्यासाठी ही दुपारची फ्लाईट अत्यंत सोयीची ठरेल. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Getty

महत्त्वाची टीप

या विमानाचे बुकिंग लवकरच सुरू होणार असून, प्रवाशांनी इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रकाची खातरजमा करावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image2
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Recommended image3
Vidhan Parishad | महायुतीचे 6 बिनविरोध, नाशिक-जळगावात बंडखोरी
Recommended image4
TUKARAM MUNDHE | पण साहेब या भेसळखोरांची तक्रार करायची तरी कुठे, पाहा हा पर्याय
Recommended image5
Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये भाजीपाल्याची विक्री; व्हायरल व्हिडीओनंतर रेल्वे प्रशासनावर प्रश्न (Watch Video)
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved