- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडताय? थांबा! १४५ लोकल रद्द आणि १३ तासांचा जम्बो ब्लॉक; प्रवासाआधी हे वाचाच!
Mumbai Local : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडताय? थांबा! १४५ लोकल रद्द आणि १३ तासांचा जम्बो ब्लॉक; प्रवासाआधी हे वाचाच!
Mumbai Local : पश्चिम आणि मध्य रेल्वेने रविवारी विविध तांत्रिक कामांसाठी १३ तासांपर्यंतचा जम्बो ब्लॉक जाहीर केला. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर १४५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, तर मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होणार आहे.

मुंबईकरांनो सावधान! रविवारी लोकलचा प्रवास ठरणार डोकेदुखी
मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेने रविवारी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर हा प्लॅन तुम्हाला मनस्ताप देऊ शकतो. पश्चिम आणि मध्य रेल्वेने विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी तब्बल १३ तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वे: १४५ गाड्या रद्द, १३ तासांचा जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर वांद्रे ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या कामासाठी (Re-girdering of Bridge No. 5) मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे.
वेळ: शनिवारी रात्री ११:०० ते रविवारी दुपारी १२:०० वाजेपर्यंत.
परिणाम: तब्बल १४५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बदल: ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरून चालवल्या जातील. तसेच प्रभादेवी पुलाचे काम सुरू असल्याने काही स्थानकांदरम्यान प्रवासाचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे: माटुंगा ते मुलुंड मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही रविवारी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:४५ वाजेपर्यंत.
अडचण: माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
ट्रान्स हार्बर मार्ग, संपूर्ण सेवा विस्कळीत
ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना.
वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत.
अपडेट: या काळात अप आणि डाऊन दोन्ही सेवा पूर्णपणे बंद राहतील.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे
१. विनाकारण गर्दी टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडा.
२. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना त्यांच्या वैध तिकिटावर वांद्रे किंवा दादरवरून उलट दिशेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

