MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • MHADA Pune Lottery: पुणेकरांनो, गुलाल उधळायला तयार राहा! म्हाडाच्या घरांची लॉटरी 'या' तारखेला; २ लाख १५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपली!

MHADA Pune Lottery: पुणेकरांनो, गुलाल उधळायला तयार राहा! म्हाडाच्या घरांची लॉटरी 'या' तारखेला; २ लाख १५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपली!

MHADA Pune Lottery: तांत्रिक अडथळे, आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे म्हाडाच्या ४,१८६ घरांची सोडत १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. म्हाडा प्रशासनाने या तारखेला दुजोरा दिला असून, एका घरासाठी जवळपास ५१ अर्जदारांमध्ये चुरस असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 08 2026, 04:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
म्हाडाच्या ४,१८६ घरांची मेगा सोडत 'या' दिवशी
Image Credit : our own

म्हाडाच्या ४,१८६ घरांची मेगा सोडत 'या' दिवशी

पुणे : आपल्या हक्काच्या घरासाठी डोळे लावून बसलेल्या पुणेकरांसाठी अखेर आनंदाची बातमी आहे! तांत्रिक अडथळे आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेली म्हाडाच्या ४,१८६ घरांची सोडत (Lottery) आता अखेर मार्गी लागणार आहे. येत्या १० फेब्रुवारीला या घरांच्या नशिबाचा फैसला होणार असून, म्हाडा प्रशासनाने याला अधिकृत दुजोरा दिला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
आचारसंहितेचा अडथळा दूर, मुहूर्ताची तारीख ठरली!
Image Credit : our own

आचारसंहितेचा अडथळा दूर, मुहूर्ताची तारीख ठरली!

गेल्या चार महिन्यांपासून या सोडतीला आचारसंहितेचा ग्रहण लागले होते. ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया होणार होती, मात्र महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे ही तारीख सतत पुढे जात होती. आता ९ फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपत असून, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १० फेब्रुवारीला ही सोडत काढली जाणार आहे. 

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
Related image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
34
एका घरासाठी ५० स्पर्धक!
Image Credit : Twitter

एका घरासाठी ५० स्पर्धक!

पुणे मंडळाच्या या सोडतीसाठी पुणेकरांनी अक्षरश: उड्या घेतल्या आहेत.

एकूण घरे: ४,१८६ (सर्वसमावेशक आणि एकात्मिक योजना)

एकूण अर्ज: २ लाख १५ हजार

परिस्थिती: एका घरासाठी जवळपास ५१ अर्जदारांमध्ये चुरस आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून अनामत रक्कम जमा असूनही निकाल लागत नसल्याने अर्जदारांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र, आता म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्यक्ष तारीख जाहीर केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

44
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडत?
Image Credit : Twitter

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडत?

या सोडतीसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांची वेळ मागण्यात आली आहे. १० फेब्रुवारीचा मुहूर्त कोणत्याही परिस्थितीत हुकणार नाही, अशी तयारी म्हाडाच्या पुणे विभागाने युद्धपातळीवर सुरू केली आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gadget Insurance: महागडी गॅजेट्स जपण्याचा हा आहे स्मार्ट मार्ग! जाणून घ्या अधिक
Recommended image2
Car Market: 33चं मायलेज, दमदार सेफ्टी! भारतीयांची पहिली पसंत ठरतेय ही CNG कार!
Recommended image3
Beauty Tips: 20 रुपयांत घरीच मिळवा फ्रेंच मॅनिक्युअरने पार्लरसारखे सुंदर हात!
Recommended image4
Car Tyres: टायर काळेच का असतात? दुसऱ्या रंगाचे का नसतात? कधी विचार केलाय?
Recommended image5
Car Market: 500 किमी रेंज! बघा नव्या अवतारातील इलेक्ट्रिक SUV चा लूक आणि फीचर्स
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana E-KYC Update: पैसे अडकलेत? लाडक्या बहिणींना दिलासा; e-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा संधी, ही आहे अंतिम तारीख
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved