महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन शनिवारी वरळी डोममध्ये करण्यात आले आहे.
Mumbai: आम्ही मराठी मीडियामध्ये शिकलो असून आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली आहेत. त्यांना मराठीचा पुळका कसा आला, एखादा व्यक्ती इंग्लिश माध्यमात शिकला म्हणून त्याच्यावर शंका घ्यायची का असं ठाकरे यांनी यावेळी ठणकावून विचारलं. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ गांडू नाही आहोत अशी राज ठाकरे यांनी गर्जना केली.
आवाज कोणाचा, आवाज मराठीचा
आवाज मराठीचा या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंच्या वतीने प्रत्येक मराठी बांधवाला मेळाव्याला उपस्थित राहण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्रात मराठी मराठीसाठी ठाकरेच! सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या मराठी, महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचे आहे? आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत,’ आणखी एका बॅनरद्वारे असा संदेश देण्यात आला आहे.
आम्ही गिरगावकर संस्थेकडून वेगवेगळ्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!’ आणि ‘ब्रँड मराठीचा’ मजकूर असलेले बॅनर परिसरात झळकताना दिसून आले आहेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि दोनही पक्षातील प्रमुख नेत्यांचे फोटो येथील फ्लेक्सवर लावण्यात आले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.