Big News Today : राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा यासह इतर घडामोडी
मुंबई - दररोज स्थानिक ते जागतिक पातळीवर अनेक रंजक घडामोडी घडतात. यातील काही थेट आपल्या जीवनावर परिणाम करतात. आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया.

राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचा जोर काहीसा ओसरला असून परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. तरीदेखील राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदेशी नागरिकांवर लक्ष
अमेरिकेत राहणाऱ्या ५.५ कोटी विदेशी नागरिकांच्या व्हिसा रेकॉर्डची ट्रम्प सरकारने तपासणी सुरू केली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन झाले आहे का हे तपासले जात आहे. गुन्हेगारी, दहशतवाद, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत राहणे यावर कारवाई केली जाईल.
मोदींचे प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ते दौरा करणार आहेत. हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.
चंद्राबाबू दिल्लीत
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी दिल्लीत दाखल झाले. आज दुपारी २ वाजता ते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेणार आहेत. राज्यासाठी आर्थिक मदत मागणार आहेत.
९ सप्टेंबरपासून आशिया कप
आशिया कपचा १७ वा हंगाम ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान UAE मध्ये होणार आहे. ८ संघ सहभागी होतील. १९ सामने खेळवले जातील. काही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत.

