उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकत्र रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोघांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. २६ तारखेला दोघ एकत्र मोर्चा काढणार आहेत. आता उद्या सकाळी राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देणार आहेत. आधी मराठी भाषा आणि आता विद्यार्थी या दोन मुद्यांवर दोघे एकत्र आले आहेत.

YouTube video player

ठाकरे बंधू रस्त्यावर उतरून लढणार 

अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरचे आंदोलन सुरु ठेवलं आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. देशाचे शिक्षणमंत्री राजीनामा देत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या घटनेवर काही बोलत नाही, आंदोलकांवर लाठीचार्ज सुरु आहे याविरोधात ठाकरे बंधूनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदित्य आणि अमित यांनी घेतली आंदोलकांची भेट 

आदित्य आणि अमित यांनी यावेळी आंदोलकांची भेट घेतली. दोघांनी मुंबईतील शिवतीर्थवरील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दिल्लीमध्ये जे झालं ते मुंबईत झालं नाही. त्यामुळं आपण मुंबई पोलिसांचे आभार मानू असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना म्हटलं आहे. आता ठाकरे बंधू रस्त्यावर उतरून काय करतात त्याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.