MCA President Election : शरद पवार गटाचे अजिंक्य नाईक यांची अध्यक्षपदी निवड

| Published : Jul 24 2024, 08:22 AM IST

अजिंक्य नाईक

सार

MCA President Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. 

MCA President Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली असून शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे ही निवडणूक परत घ्यावी लागल्याची माहिती देण्यात आली. या पोटनिवडणुकीसाठी आशिष शेलार आणि शरद पवार असे दोन गट होते. यामध्ये शरद पवार गटाच्या अजिंक्य नाईक यांचा विजय झाला आहे. यावेळी शरद पवार यांना अजिंक्य यांनीच सूत्रे हातात घ्यावीत असे वाटत होते पण यावेळी भाजपाच्या वतीने विरोधात उमेदवार उभा करण्यात आला होता. 

निवडणुकीत नेमकं झालं काय? - 
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार गटाने बाजी कशी मारली हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन अतिशय श्रीमंत असून याचे अध्यक्ष असणे ही प्रतिष्ठेची गोष्ट आहे. या असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने अजिंक्य नाईक हेच उमेदवार असणार असून त्यांच्या नावाला पाठींबा दिला होता. भाजपाच्या सुप्त गटातूनही या नावाला पसंती असल्याचे दिसून आले होते. मुंबई संघाने यावर्षीचा रणजी करंडक जिंकल्यामुळे त्यांनी परत पूर्वीसारखा फॉर्म मिळवला होता. अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यरत होते. 

अखेरच्या टप्यात निवडणुकीचा रंग बदलला - 
अखेरच्या टप्यामध्ये निवडणुकीचा रंग बदलल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी शेवटच्या टप्यामध्ये शरद पवार गटाने अजिंक्य नाईक यांच्या विजयासाठी खासकरून प्रयत्न केले. सह्याद्री अतिथूगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती, या चर्चेमध्ये अजिंक्य नाईक यांना सहकार्य करण्यासंदर्भातील संवाद झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे गट शेवटच्या टप्यात निवडणुकीत उतरला. आशिष शेलार यांनी उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना जिंकवता आले नाही. 
आणखी वाचा - 
Budget 2024 : अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, A टू Z बजेट जाणून घ्या एकाच क्लिकवर
Budget 2024 : बजेटमध्ये नागपूर मेट्रोला 683 कोटी, दुसऱ्या टप्प्याला मिळाला बूस्ट