सार

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी नागपूर मेट्रोला 683 कोटी दिले असून आतापर्यंत केंद्राकडून नागपूर मेट्रोला 1,345 कोटी मिळाले आहेत.

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पात महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला 683 कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. नागपूर मेट्रो प्रकल्पाला 683 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2028 पर्यंत पूर्ण करणार आहे.

दुसर्‍या टप्पातील गुंतवणूक 6,708 कोटी

दुसर्‍या टप्पातील गुंतवणूक 6,708 कोटी रुपयांची असून त्यात केंद्र आणि राज्य सरकारचा समान वाटा आहे. केंद्र सरकारकडून नागपूर प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्पाला आधी 662.33 कोटी आणि आता 683 कोटी रुपये असे एकूण 1,345.33 कोटी रुपये तर राज्य सरकारकडून आतापर्यंत केवळ 60 कोटींचा निधी मिळाला आहे. या निधींमधून नागपूर मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचा विकास सुरू आहे. या बांधकामाला वर्ष 2024-25 करिता 745 कोटींची गरज होती. आता ही गरज 683 कोटींच्या घोषणेने पूर्ण होणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी ईएसआर (18.6 किमी), ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी (13 किमी), प्रजापतीनगर ते कापसी (5.5 किमी) आणि लोकमान्यनगर ते हिंगणा (6.7 किमी) असा एकूण 43.8 किमीचा विकास होणार आहे. दुसर्‍या टप्प्याच्या पूर्णतेनंतर नागपूर मेट्रोचा एकूण 82 किमीचा टप्पा पूर्ण होईल. या चारही टप्प्याच्या विकासाच्या निविदा काढण्यात आल्या असून बांधकाम सुरू आहे. जागा अधिग्रहणाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. जागेसाठी मालकाला चारपट रक्कम देण्यात येत आहे. राजकीय इच्छाशक्तीमुळेच नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याच्या विकासाला निधी मिळाल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

आणखी वाचा : 

Budget 2024 : बजेटमध्ये महिलांना खास भेट, 3 लाख कोटी खर्च केले जाणार

Budget 2024 : कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वत झाल्याची वाचा संपूर्ण यादी

Budget 2024 : अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, A टू Z बजेट जाणून घ्या एकाच क्लिकवर