Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा, पाहा कर्तव्य पथावरील परेडचा शानदार VIDEO

| Published : Jan 26 2024, 11:34 AM IST / Updated: Jan 26 2024, 04:44 PM IST

pm-Narendra-Modi-wear-bandhani-print-pagdi
Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा, पाहा कर्तव्य पथावरील परेडचा शानदार VIDEO
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

देशाचा आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील कर्तव्य पथावर आता परेडला सुरुवात होत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला जात आहे.

Republic Day 2024 : देशाचा आज (26 जानेवारी) 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्तव्य पथावर पोहोचण्याआधी राष्ट्रीय युद्ध स्मारक (National War Memorial) येथे भेट देत देशाच्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणाऱ्या परेडसाठी पोहोचले. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) यांच्यासोबत कर्तव्यपथावर जाण्यासाठी निघाल्या.

कर्तव्य पथावर पोहोचल्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत केले. यानंतर कर्तव्य पथावर परेडला सुरुवात झाली आहे.

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर ट्विट करत म्हटले की, देशातील सर्व परिवारातील सदस्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

 

गुगलकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलकडूनही खास डुडल तयार करण्यात आले आहे. गुगलच्या डुडलमध्ये प्रजासत्ताक दिनाची झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये कालांतराने बदललेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खास डुडल तयार केल्याचे दिसून येतेय.

आणखी वाचा : 

Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतीय विद्यार्थ्यांना गिफ्ट, या सुविधेची केली घोषणा

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Read more Articles on