प्रजासत्ताक दिनानिमित्त या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथ, इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेडचे आयोजन केले जाते. कर्तव्य पथावरील परेड पाहण्याचा अनुभव आयुष्यात नक्की एकदा तरी घ्या.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम देशाचा ध्वज फडकवला होता. लाल किल्ला भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाचा प्रतीक आहे.
अमृतसरमधील जालियनवाला बागेच्या येथे तुमच्यामधील देशभक्ती नक्कीच जागी होईल. या ठिकाणी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सोहळा पाहाण्यासारखा असतो. भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये बीटिंग रिट्रीटचा सोहळा पार पडला जातो.
पहिल्या महायुद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंडिया गेट उभारण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनावेळी येथे परेडचे आयोजन केले जाते.