सार
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींची श्रीकांत शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली गेली.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाचा फैरी झाडल्या जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. खरंतर, प्रियंका चतुर्वेदींनी (Priyanka Chaturvedi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
एका सभेला संबोधित करताना प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले की, श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेय की, "माझा बाप गद्दार आहे." बुधवारी (08 मे) संध्याकाळी प्रियंका चतुर्वेदी उत्तर मुंबईत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या संजय दिना पाटील यांच्या समर्थनार्थ एका जनसभेला संबोधित करत होत्या. यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदेंसह श्रीकांत शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.
भाजपाचा पराभव होतोय - आदित्य ठाकरे
दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटातील नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले की, "भाजपा पराभवाच्या जवळ आहे. हेच कारण आहे की, ते हिंदू-मुस्लिमाचा मुद्दा घेऊन बसलेत. आजचा भाजपा पक्ष देशाचे संविधान बदलू पाहत आहे. यामुळेच संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जनता आम्हाला मतदान करेल."
संजय निरुपम यांचे प्रियंका चतुर्वेदींना उत्तर
शिंदे गटातील शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या विधानावरुन सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संजय निरुपम यांनी म्हटले की, “उद्धव ठाकरे गटातील महिला खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरील उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदींना आपल्याच विधानावर शब्दश: विश्वास असेल तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिले पाहिजे की, माझा बाप महागद्दार आहे. कारण गद्दारी आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी भाजपासोबत युती मोडत केली. महागद्दारी तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजलि देऊन केली आणि ज्या काँग्रेसचा नेहमीच विरोध केला त्यांच्याशीच हातमिळवणी केली.”
आणखी वाचा :
काँग्रेसधमध्ये शरद पवारांना पक्ष करायचा होता विलिन पण.... संजय निरुपम यांनी केले हे खुलासे