जर चंद्रदर्शन उशिरा झाले, तर अशुरा म्हणजेच मोहरमचा 10वा दिवस 7 जुलै (सोमवार) रोजी साजरा केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये सोमवारच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर होऊ शकते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात एकत्र येऊन वरळी येथे भव्य सभा घेतली. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक राज्यांच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल आणि महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली.
मराठी भाषिक समाजात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला अल्पवयीन, 16 वर्षीय विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षिकेवर विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.
मुंबईत राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बेकायदेशीररित्या सुरू असणारी बाईक टॅक्सीची सुविधा आता बंद करण्यात आली आहे. ओला, उबर या कंपन्यांनी देखील त्यांची बाईक टॅक्सीची सुविधा बंद केली आहे.
महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन शनिवारी वरळी डोममध्ये करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजराती समुदायाला सन्मान देण्यासाठी "जय गुजरात" घोषणा दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी टीकाकारांना स्वतःकडे पाहण्यास सांगितले.
मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या वादात भर घातली आहे. या पोस्टमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मराठीच्या मुद्द्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे.
मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओ शूट करणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे. हे शूट मुंबई - अहमदाबाद मार्गावरील पाली व्हिलेज रिसॉर्ट येथे करण्यात आलं होतं आणि व्हिडीओ २०२४ मध्ये अपलोड करण्यात आला होता.
चांगला क्रेडिट स्कोअर सहसा कमी दर आणि जलद वितरणाचे आश्वासन देतो. परंतु वाईट क्रेडिट स्कोअरमुळे नाकारले जाऊ शकते किंवा जास्त व्याजदर मिळू शकतो.
mumbai