उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात एकत्र येऊन वरळी येथे भव्य सभा घेतली. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक राज्यांच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल आणि महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली.

हिंदू भाषा सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर सरकारला आदेश रद्द करावा लागला. दोघांनीही हा आदेश रद्द केल्यामुळं भव्य सभेचं वरळी येथे आयोजन केलं आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं आहे.

हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता येत नाही - 

हिंदी भाषा बोलणारे राज्य आर्थिकदृष्टया मागासलेले आहेत. हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आले नाही. रोजगाराला इकडे यायचं आणि आम्ही हिंदी शिकायची का? पाचवीनंतर मुले का बॉलिवूडमध्ये जाणार आहेत का? आमचा भाषेला विरोध नाही पण भाषा उभी करायला वर्ष लागतात, असं यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अमित शाह म्हणाले इंग्रजी येतं त्यांना इंग्रजी येत असल्याची लाज वाटेल. तुम्हाला नाही येत’ असं राज ठाकरे यांनी म्हणताच सगळे लोक हसायला लागले.

हिंद प्रांतावर मराठ्यांनी सव्वाशे वर्ष राज्य केलं आहे. गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश पर्यंत आम्ही जाऊन पोहचलो आहोत. हिंदी भाषा ही २०० वर्षांपूर्वीची आहे. यांनी फक्त भाषेसाठी डिवचून पाहिलं. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का?. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोण कमी हसलं आणि कोण जास्त हसलं - 

मी मुलाखतीत म्हटलं होत, त्यातून या सगळ्या गोष्टी सुरु झाल्या आहेत. कुठल्याही, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे मा. बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं शक्य झाला आहे. “आता संध्याकाळी सगळं सुरु होईल. आता काय वाटतं, दोघांची बॉडी लँगवेज कशी होती, कोण कमी हसलं, कोणं जास्त हसलं. मूळ विषय सोडून इतर विषयांवर चर्चा करतात” असं राज म्हणाले आहेत. कुठलाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असून माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पहायच नाही” असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.