Ganesh Chaturthi 2025 : अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. शिवतीर्थवर झालेल्या या भेटी दरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये भावनिक क्षण पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, त्यांना पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती पाळाव्या लागतील.
या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महानगरांतील राजकीय चित्र पालटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा आरक्षणासाठी लातूरच्या एक तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशी ही घटना घडल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी अंतरवली सराटी येथे समाज बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मोर्चा मुंबईला नेणार असल्याचे सांगितले.
विरार पूर्वमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून आई-वडील आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. चिमुकलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर ही दुर्घटना घडली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
२७ ऑगस्ट २०२५ चं पंचांग : २७ ऑगस्ट, बुधवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. दिवसभराचे शुभ मुहूर्त, ग्रहांची माहिती आणि इतर तपशील जाणून घ्या.
आजचे राशिभविष्य : २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी शुभ आणि शुक्ल नावाचे २ शुभ योग दिवसभर राहतील. बुध आणि शुक्र ग्रह एकत्र असल्याने लक्ष्मी नारायण योगही तयार होईल. जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?
गणेश चतुर्थी २०२५ : संपूर्ण देशात आणि जगभरात गणेश चतुर्थीचा सण धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. याच दरम्यान मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट यांनी मुंबईतील त्यांच्या घरी बाप्पाचे भव्य स्वागत केले.
पुणे : घराघरात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा हा मंगल दिवस बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. भाविकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असून बाप्पाच्या स्वागताची लगबग महाराष्ट्रभर सुरू झाली आहे.
mumbai