मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात दररोज कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. यानुसार 53 रेल्वे स्थानकाजवळील 4,773 बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रतीक्षा असते की, आंबे केव्हा खायला मिळणार. त्यात पण अनेकांना खरा हापूस आंबा मिळणार का ? असा प्रश्न पडलेला असतो. पण आता हे संपूर्ण टेन्शन घायची गरज नाही. कारण देवगडचा हापूस आंबा आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेही पोस्टाने.
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरू झाली आहे. याच्याच पहिल्या दिवशी एलपीजी गॅस किंमतीत फार मोठी घट झाली आहे.
मुंबईतील उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य लोकसभेच्या जागेवरील उमेदवारांची घोषणा राजकीय पक्षांनी केलीय. पण अद्याप चार लोकसभेच्या जागांबद्दल महाविकास आघाडी आणि एनडीएकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये उद्धव ठाकरे ते सुषमा अंधारे यांची नावे आहेत.
मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभेची जागा फार महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यामुळे राहुल शेवाळेंचा विजय होणार का? याचे गणित जाणून घेऊया सविस्तर...
मुंबईतील फोर्ट परिसरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत बिस बॉस-17 सीझनचा विजेता मुनव्वर फारूकीला ताब्यात घेतले. मुनव्वरसह अन्य 13 जणांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मुंबईकरांना संपूर्ण आठवडाभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. सोमवारी शहरातील आर्द्रता पातळी 73 टक्के आणि उपगनरांमध्ये 58 टक्के असल्याची नोंद करण्यात आली.
होळीच्या दिवशी समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाचजण गेले होते. त्यावेळी एकाचा बुडून मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मलाड येथील एका 15 फूट खोल गटारात पडून एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय अन्य एकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.