सार

मुंबईतील काही संग्रहालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पोलिसांना शुक्रवारी (5 जानेवारी) आला होता. या ईमेलमध्ये मुंबईतील काही प्रमुख संग्रहालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.

Bomb Threat Email to Mumbai Police : मुंबईतील एकत्रितपणे काही संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस यंत्रणा अ‍ॅलर्ट झाली. यानंतर बॉम्ब निकामी पथकाने अधिक तपास करण्यास सुरूवात केली.

खरंतर धमकी देणारा एक ईमेल मुंबई पोलिसांना आला होता. या ईमेलमध्ये कुलाबा (Colaba) येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya) आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह (Nehru Science Center) काही प्रमुख संग्रहालयांमध्ये स्फोट घडवून आणू असे म्हटले होते.

या ईमेल नंतर पोलीस यंत्रणा कुलाबा आणि वरळीसह काही परिसरात अ‍ॅलर्ट झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, ईमेलमध्ये लिहिण्यात आलेल्या ठिकाणी स्फोटासंबंधित काहीही मिळाले नाही. आता पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

मुंबई पोलिसांनी काय म्हटले?
मुंबई पोलिसांनी म्हटले की, कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू सायन्स सेंटरसह प्रमुख संग्रहालयांमध्ये स्फोट करण्यात येईल ही गोष्ट ईमेलमध्ये लिहिली होती. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाकडून संग्रहालयांमध्ये अधिक तपास केला असता तेथे स्फोटासंबंधित काही मिळाले नाही.

एका पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, धमकीच्या ईमेलमध्ये संग्रहालयांमध्ये काही बॉम्ब लावण्यात आले असून त्यांचा कधीही स्फोट होईल असे म्हटले होते. या प्रकरणात आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सायबर विभागाकडून मुंबई पोलिसांना ईमेल ज्या ठिकाणाहून आलाय ते ठिकाण ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आणखी वाचा : 

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून व्यक्त केला खेद, म्हणाले....

Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या

Mumbai : शहरात काही ठिकाणी स्फोट होतील...धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर