- Home
- Mumbai
- Mumbai Local: मुंबईत मध्यरात्री धावणार विशेष लोकल! कल्याणहून 2:30 आणि पनवेलहून 2:40 ला गाडी सुटणार, जाणून घ्या नेमकं कारण
Mumbai Local: मुंबईत मध्यरात्री धावणार विशेष लोकल! कल्याणहून 2:30 आणि पनवेलहून 2:40 ला गाडी सुटणार, जाणून घ्या नेमकं कारण
Mumbai Local: नेव्ही हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री दोन विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या कल्याण-पनवेल येथून CSMT साठी सुटतील, ज्यामुळे धावपटूंना आणि इतर प्रवाशांना पहाटे पोहोचण्यास मदत होईल.

मुंबईत मध्यरात्री धावणार विशेष लोकल!
मुंबई: मुंबईची लोकल ही इथल्या लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज प्रचंड गर्दीतही लोकांना त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवणाऱ्या या लोकल सेवेमध्ये आता एक महत्त्वाचा बदल होत आहे. साधारणपणे पहाटे सुरु होणारी आणि रात्री एक वाजेपर्यंत चालणारी लोकल सेवा यावेळी मध्यरात्रीपासूनच सुरु होणार आहे. यामागचं खास कारण म्हणजे नेव्ही हाफ मॅरेथॉन.
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबईत होणाऱ्या नेव्ही हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार आहेत. त्यांना पहाटेच्या वेळी सहज पोहोचता यावं, यासाठी मध्य रेल्वेने या शनिवारी रात्री दोन विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे सहभागी धावपटू व नागरिकांना प्रवासाची मोठी सोय होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
असं असेल विशेष लोकलचं वेळापत्रक
पहिली विशेष लोकल – कल्याण ते CSMT
प्रस्थान : रात्री 2:30
मार्ग : सर्व स्थानकांवर थांबा
आगमन : पहाटे 4:00, CSMT
दुसरी विशेष लोकल – पनवेल ते CSMT (हार्बर लाइन)
प्रस्थान : रात्री 2:40
मार्ग : सर्व स्टेशनवर थांबा
आगमन : पहाटे साधारण 4:00, CSMT
या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मध्यरात्रीही सहज व सुरक्षित प्रवास करता येणार
या विशेष गाड्यांमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना तसेच इतर प्रवाशांना मध्यरात्रीच्या सुमारासही सहज व सुरक्षित प्रवास करता येणार आहे.

