- Home
- Mumbai
- Mumbai Cold Wave Alert: मुंबईसाठी पुढील 12 तास अतिशय निर्णायक! कोल्ड वेव्हची शक्यता, शहरभर अलर्ट जारी
Mumbai Cold Wave Alert: मुंबईसाठी पुढील 12 तास अतिशय निर्णायक! कोल्ड वेव्हची शक्यता, शहरभर अलर्ट जारी
Mumbai Cold Wave Alert: हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील 12 तास निर्णायक असल्याचे म्हटले आहे, कारण तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात पारा 11-15°C पर्यंत खाली येऊ शकतो, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

मुंबईसाठी पुढील 12 तास अतिशय निर्णायक!
मुंबई: राज्यातील तापमान सतत घसरत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांखाली पोहोचला आहे. याच वातावरणाचा परिणाम आता मुंबईवरही दिसू लागला आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की पुढील 12 तासांत मुंबईत तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई परिसरात गारठा वाढणार, नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा
नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये थंडीने जोर धरला आहे. पुढील काही तासांत या परिसरातील तापमान 14–15°C च्या आसपास येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कल्याण–डोंबिवली परिसरातही गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, येथे रात्री तापमान 11–13°C पर्यंत खाली जाणारा कल दिसत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम
पुण्यातील तापमानात सर्वात जास्त घसरण नोंदली जात आहे. सोमवारी पुण्यात 9°C तापमान नोंदवले गेले असून, पुढील 12 तासांत ते 7–9°C च्या दरम्यान राहील असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री आणि पहाटे बाहेर पडताना विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
थंडीची लाट राज्यभर पसरणार?
मुंबईसह आसपासच्या भागांत पुढील काही तास तापमानात आणखी घट होणार असल्याने, हवामान विभागाने संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करणे आणि थंड वातावरणात बाहेर पडताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

