सार

Mumbai Mega Block On Sunday 7 July 2024 : रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

Mumbai Mega Block On Sunday 7 July 2024 : मध्य रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी १०.५० ते दुपारी ०३.२० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४६ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०२.४२ दरम्यान डाऊन जलद / निम जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. १० मिनिटे उशिराने धावतील. अप जलद / निम जलद लोकल कल्याण येथून सकाळी १०.२८ ते कल्याण येथून दुपारी ०३.१७ दरम्यान कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. अप आणि डाउन मेल / एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि पनवेल - वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

१) वसई रोड - दिवा वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी कोपरपर्यंत (सकाळी १०.३१) धावेल. कोपर ते दिवा स्थानकादरम्यान रद्द राहील.

२) वसई रोड -दिवा वसई रोड येथून दुपारी १२.५० वाजता सुटणारी गाडी कोपरपर्यंत (दुपारी ०१.३७) चालविण्यात येईल. कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

३) दिवा - वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल. वसई रोड येथे दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

४) दिवा - वसई रोड कोपर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटेल. वसई रोड येथे दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

५) रत्नागिरी - दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

पश्चिम रेल्वे -

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.

डाउन हार्बर -

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.४४ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेलहून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेलहून सुटणार आहे.

आणखी वाचा :

धक्कादायक बातमी, कळवा रुग्णालयात 30 दिवसांत 21 नवजात बालकांचा मृत्यू