धक्कादायक बातमी, कळवा रुग्णालयात 30 दिवसांत 21 नवजात बालकांचा मृत्यू

| Published : Jul 06 2024, 01:07 PM IST

kalwa hospital

सार

ठाण्यातील महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

 

ठाणे : ठाण्यातील महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत परत एकदा प्रश्न चिन्ह उभे राहिले असून या प्रकरणामुळे ठाणे शहर हादरले आहे. कळवा रुग्णालयात जून महिन्यात 512 महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यापैकी 294 गर्भवतींचे सिझर करण्यात आले तर 90 बालकांचा जन्म अतिदक्षता विभागात झाला होता. मात्र यापैकी 21 नवजात बाळांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

गेल्यावर्षी एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्याने उडाली होती खळबळ

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्यावर्षी एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असताना, आता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जून महिन्यामध्ये 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

शहरी, ग्रामीण अणि दुर्गम आदिवासी भागातून उपचारासाठी येतात रुग्ण

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराच्या चांगल्या सोयीसुविधा असल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण अणि दुर्गम आदिवासी भागातून रुग्ण येतात. अशातच जून महिन्यात बाळंतपणासाठी देखील गर्भवती महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. दरम्यान या प्रसूती झालेल्या महिलांच्या 90 नवजात बालकांचे वजन 1 किलो वजनापेक्षा कमी होते. तसेच मृत्यू झालेल्या 21 बालकांपैकी 19 बालक हे शहराबाहेरील होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.

आणखी वाचा :

CM Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल?, फॉर्म आताच डाऊनलोड करुन जाणून घ्या संपूर्ण माहिती