- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच! १५३ लोकल ट्रेन रद्द; 'या' मोठ्या स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत!
Mumbai Local : मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच! १५३ लोकल ट्रेन रद्द; 'या' मोठ्या स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत!
Mumbai Local : रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मोठ्या मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत होणार आहे. पश्चिम रेल्वेवर तब्बल १५३ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील काही स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

रविवारी मुंबईकरांची कोंडी! मेगाब्लॉकमुळे 153 लोकल रद्द
मुंबई : रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बाहेर जाण्याची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मोठ्या प्रमाणात मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, याचा थेट परिणाम मुंबई लोकल सेवेवर होणार आहे. काही स्थानकांवर लोकलचा थांबा पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, अनेक लोकल गाड्या रद्द राहणार आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
वेळ : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55
थांबे रद्द असलेली स्थानके
मशीद
सँडहर्स्ट रोड
चिंचपोकळी
करी रोड
विद्याविहार
या कालावधीत या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था वापरावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावरही लोकल सेवा विस्कळीत
ट्रान्स-हार्बर मार्गावरही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे – वाशी – नेरुळ मार्ग
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत अप-डाऊन मार्गावर ब्लॉक
काही लोकल सेवा रद्द तर काही उशिराने धावणार
पश्चिम रेल्वेवर मोठा फटका; तब्बल 153 लोकल रद्द
पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे रविवारी एकूण 153 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अप मार्ग : 79 लोकल रद्द
डाऊन मार्ग : 74 लोकल रद्द
ब्लॉकचा कालावधी
जलद मार्ग : रात्री 1 ते सकाळी 6.30
अप धीमा मार्ग : रात्री 1 ते पहाटे 4
प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सूचना दिली आहे की,
प्रवासापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासा
शक्य असल्यास मेट्रो, बस किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करा
गर्दी टाळण्यासाठी नियोजनपूर्वक प्रवास करा

