मुंबईत समुद्राच्या पुढील काही दिवसांत उंचच उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत 19 वेळा समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता आहे.
Mumbai High Tied Alert : मुंबईत समुद्राचा पारा चढणार आहे. तर येत्या २४ जून ते २८ जून २०२५ या कालावधीत सलग पाच दिवस समुद्रात मोठ्या भरतीचे दृश्य पाहायला मिळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान एकूण १९ वेळा समुद्रात मोठी भरती होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या भरतीदरम्यान साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याने, नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भरतीचे संभाव्य दिवस आणि वेळा (लाटांची उंची मीटर्समध्ये):
- २४ जून : सकाळी ११.१५ वाजता – ४.५९ मीटर
- २५ जून : दुपारी १२.०५ वाजता – ४.७१ मीटर
- २६ जून : दुपारी १२.५५ वाजता – ४.७५ मीटर
- २७ जून : दुपारी १.४० वाजता – ४.७३ मीटर
- २८ जून : दुपारी २.२६ वाजता – ४.६४ मीटर
या काळात समुद्रकिनाऱ्याच्या जवळ जाणे टाळावे. मोठ्या लाटा आणि संभाव्य मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचण्याचा धोका आहे. विशेषतः दररोज भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याची आणि लहान नौकांनी समुद्रात न जाण्याची सूचना दिली आहे.मुंबईकरांनी यावेळी सतर्क राहून अधिकृत सूचना आणि अपडेट्सकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील पावसाची स्थिती
दरवर्षीप्रमाणेच यंदाही कोकणात मान्सूनने सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी मिळालेली नाही. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. खरंतर, जूनच्या मध्यानंतर मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने नद्या, नाले, ओढे आणि धरणं प्रवाहित केली आहेत. त्यामुळे धरणक्षेत्र आणि नदीकाठच्या भागांतील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


