MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल CM शिंदेंकडे सुपूर्द, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल CM शिंदेंकडे सुपूर्द, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

Maratha Aarakshan Survey : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 

2 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Feb 16 2024, 11:55 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : CMO Maharashtra

Maratha Aarakshan Survey : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

26
Image Credit : CMO Maharashtra

आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडे तीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

36
Image Credit : CMO Maharashtra

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

46
Image Credit : CMO Maharashtra

या कामकाजाकारिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवानी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. 

तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहिती सुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्याविषयीची सुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.

56
Image Credit : CMO Maharashtra

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. शुक्रवारी सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल”, असे यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पाऊले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.

#थेटप्रसारण
राज्य मागास वर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा पत्रकारांशी संवाद...https://t.co/3yC2FK18Up

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 16, 2024

66
Image Credit : CMO Maharashtra

आंदोलन मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पाऊले उचलली आहे. आयोगाने विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील आम्ही बोलावले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Third Airport : मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाचा मास्टरप्लॅन! कधी, कुठे आणि कसा? CM फडणवीसांनी दिली माहिती
Recommended image2
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Recommended image3
Mumbai Local : पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक! सोमवार–मंगळवारी 240 लोकल रद्द, प्रवाशांची मोठी कोंडी
Recommended image4
Mahayuti Manifesto Mumbai : मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा आज जाहीर; महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर भर
Recommended image5
शिवाजी पार्कवर 20 वर्षांनंतर राज–उद्धव ठाकरे एकत्र; BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved