सार

Lok Sabha Election 2024 : मुंबईत लोकसभेच्या मतदानावेळी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा केली जाणार आहे. याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.

Lok Sabha Election 2024 : मुंबईत होणाऱ्या चार मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिलला जारी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. याशिवाय आदर्श आचार संहिताही लागू केली जात आहे. अशातच जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, सध्याच्या वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे आणि लवकरात लवकर नागरिकांना मतदान करता यावे यासाठी विशेष सुविधा केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज 26 एप्रिलपासून भरण्यास होणार सुरूवात
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबईत 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. मुंबईतील चार लोकसभेच्या मतदारसंघात 26 विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. येथील मतदारांची संख्या 74 लाख 879 आहे. पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 82 हजार 90 आहे. याशिवाय महिला मतदारांची संख्या 34 लाख 24 हजार 477 आहे.

3 मे पर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज
उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज येत्या 3 मे पर्यंत दाखल करता करता येणार आहेत. या अर्जांची तपासणी 4 मे रोजी होणार आहे. 6 मे रोजी उमेदवारांना आपली नावे निवडणुकीतून मागे घेता येणार आहेत. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. याशिवाय मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, मतदानावेळी एक केंद्र पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केले जाणार आहे. दुसरे मतदान केंद्र पूर्णपणे तरुण अधिकारी आणि तिसरे मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित केले जाणार आहे. याशिवाय मतदानावेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला जाणार आहे.

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी असणार विशेष सुविधा
मतदान केंद्रावर पाणी, वीजेसह अन्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट बससह प्रवासी वाहनांची सुविधा असणार आहे. यासाठी मतदारांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाहीये.

आणखी वाचा : 

RBI ची एकाचवेळी दोन बँकांवर मोठी कारवाई, खात्यातून केवळ 15 हजार रुपयांची रक्कम काढता येणार

दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय