- Home
- Mumbai
- Central Railway Megablock: 1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, लोकल व एक्सप्रेस सेवेवर मोठा परिणाम!; जाणून घ्या वेळापत्रक
Central Railway Megablock: 1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत मार्गावर जम्बो मेगाब्लॉक, लोकल व एक्सप्रेस सेवेवर मोठा परिणाम!; जाणून घ्या वेळापत्रक
Central Railway Megablock: मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर 1-2 ऑक्टोबरला प्री-नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणारय. यामुळे कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली असून अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला.

1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहणार
मुंबई: मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर प्री-नॉन इंटरलॉकिंग (PNI) कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेतले जात आहेत. यामुळे 1 आणि 2 ऑक्टोबरला कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत राहणार आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करणे अत्यंत गरजेचे आहे.
कर्जत स्थानकावर तांत्रिक कामं, काय आहे कारण?
रेल्वे स्थानकावर जुनी इंटरलॉकिंग प्रणाली हटवून अत्याधुनिक प्रणाली बसवण्याचं काम सुरू आहे. यामुळे भविष्यात रेल्वे अधिक वेळेवर, सुरक्षित आणि जलदगतीने धावू शकेल. मात्र या सुधारणा करताना रेल्वे गाड्यांची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत होणार आहे.
विशेष ब्लॉकचा कालावधी
1 ऑक्टोबर: सकाळी 11:20 ते सायंकाळी 05:20
2 ऑक्टोबर (दसरा): सकाळी 11:00 ते दुपारी 03:30
ब्लॉक लागू होणारा विभाग
भिवपुरी – जांब्रुंग – ठाकूरवाडी – नागनाथ – कर्जत
लोकल सेवेवर परिणाम
कर्जत-खोपोली दरम्यान सर्व अप आणि डाउन लोकल गाड्या रद्द
काही लोकल गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन
नेरळ, अंबरनाथ, ठाणे येथे थांबवण्यात येणार
प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी
एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांवर परिणाम
खालील गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाणार आहे आणि त्या थांबवण्यात येणार
जोधपूर-हडपसर एक्सप्रेस
सीएसएमटी-भुवनेश्वर एक्सप्रेस
सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस
बिकानेर-यशवंतपूर एक्सप्रेस
पनवेल-नांदेड एक्सप्रेस
मदुरै एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस
काही गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील.
2 ऑक्टोबर – काही गाड्या रद्द
2 ऑक्टोबर रोजी काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द
शॉर्ट टर्मिनेशन आणि ओरिजिनेशनमुळे प्रवाशांनी वेळेत माहिती घ्यावी
या कामामुळे भविष्यातील फायदे
जलद आणि सुरक्षित रेल्वे सेवा
वेळेवर धावणाऱ्या गाड्या
इंटरलॉकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण
अपघाताचा धोका कमी
कर्जत – एक महत्त्वाचा जंक्शन
मुंबई, खोपोली, लोणावळा आणि पुणे यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या स्थानकावर होणारे बदल सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 1-2 ऑक्टोबरला प्रवास करताना काळजी घ्या आणि वेळापत्रक तपासून प्रवास करा.

