- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल!, या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल!, या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: राज्यात मुसळधार पावसानंतर काहीशी विश्रांती मिळाली असली तरी, हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी पुन्हा बदलांची शक्यता वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाने घेतली विश्रांती
मुंबई: मागील काही दिवसांत राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसह ग्रामीण जीवन विस्कळीत झालं होतं. मात्र २९ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत आकाश काहीसे साफ झाले आणि पावसाने विश्रांती घेतली. यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तरीही ३० सप्टेंबर रोजीही हवामानात बदलांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Heavy rainfall very likely to occr at isolated places in the districts of Konkan-Goa and ghats of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/kUBtWgffQz— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 29, 2025
कुठे किती पाऊस?, विभागनिहाय अंदाज
कोकण विभाग
पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई व ठाणे परिसरात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज.
विशेषतः घाटमाथा परिसरात पावसाचा जोर थोडा अधिक असू शकतो.
प्रवासी आणि शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याचं आवाहन.
मराठवाडा विभाग
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या कोणताही अधिकृत अलर्ट नाही.
विदर्भ विभाग
अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यांत पावसाची शक्यता कमी, काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवायला मिळू शकतो.
अंशतः ढगाळ हवामान राहू शकतं.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे जलपातळी वाढलेली असल्याने स्थानीय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हवामान विभागाचा इशारा
अनावश्यक प्रवास टाळावा
विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर थांबू नये
शेतकऱ्यांनी पिकं, जनावरे आणि इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे
30 सप्टेंबरचं महाराष्ट्रातील हवामान
राज्यात पावसाचा जोर कमी असला, तरी काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता कायम आहे.

