- Home
- Mumbai
- उद्या गुरुनानक जयंती, कार्तिकी पौर्णिमेची शाळा, कॉलेज, कार्यालयांना सुटी आहे का? जाणून घ्या
उद्या गुरुनानक जयंती, कार्तिकी पौर्णिमेची शाळा, कॉलेज, कार्यालयांना सुटी आहे का? जाणून घ्या
उद्या गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आहे... मग महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज आणि कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी असेल का? याबद्दलची संपूर्ण माहिती येथे देत आहोत.

उद्या सुट्टी आहे का?
उद्या (5 नोव्हेंबर, बुधवार) गुरुनानक जयंती आहे. कार्तिक पौर्णिमाही आहे. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमा हा दिवस खूप पवित्र मानला जातो. या दिवशी लोक उत्सव साजरा करतात, प्रत्येक मंदिरात भाविकांची गर्दी असते. तसेच गुरुनानक जयंतीही उद्याच आहे. या दोन सणानिमित्त शाळा-कॉलेज आणि कार्यालयांना सुट्टी आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे.
महाराष्ट्रात अधिकृत सुट्टी
गुरुनानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात अधिकृत सुट्टी आहे. सरकारी सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये याचा उल्लेख आहे. कार्तिक पौर्णिमाही 5 नोव्हेंबरलाच आहे. हा दिवस हिंदू आणि शीख दोघांसाठीही पवित्र असल्याने सरकारने उद्या (बुधवार) पूर्ण दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 नोव्हेंबरची सुट्टी निश्चित आहे. ही सुट्टी महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी शाळा-कॉलेजांनाही लागू असेल. त्यामुळे महाराष्ट्रात सुट्टीबाबत कोणताही गोंधळ नाही. एवढेच नव्हे तर तेलंगणा या राज्यातही उद्या सुटी आहे. केवळ आंध्र प्रदेशात सुटी आहे की नाही याचा स्पष्ट उल्लेख नाही.
महिन्यातील इतर सण असे असतील
नोव्हेंबर २०२५: शालेय सुट्ट्यांचा झटपट आढावा
विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात असलेल्या महत्त्वाच्या सुट्ट्या आणि कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
५ नोव्हेंबर, बुधवार:
सुट्टी: गुरु नानक जयंती
स्वरूप: सार्वजनिक/धार्मिक सुट्टी. या निमित्ताने शाळा बंद राहतील.
१४ नोव्हेंबर, शुक्रवार:
विशेष दिवस: बालदिन
स्वरूप: हा दिवस साजरा केला जाईल, सहसा शाळेत विशेष कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम किंवा स्नेहभोजन आयोजित केले जाते. या दिवशी शाळा सुरू राहण्याची शक्यता जास्त आहे.
२४ नोव्हेंबर, सोमवार:
सुट्टी: गुरु तेग बहादूर शहीद दिन
स्वरूप: हा एक स्मृतिदिन असल्याने, राज्यातील काही शाळांना सुट्टी असेल, तर उर्वरित शाळांमध्ये कामकाज सुरू राहील. या सुट्टीसाठी तुमच्या शाळेच्या स्थानिक सूचना तपासाव्यात.
रविवार:
साप्ताहिक सुट्टी: नियमित साप्ताहिक सुट्टी (२, ९, १६, २३ आणि ३० नोव्हेंबर) म्हणून शाळा बंद राहतील.

