- Home
- Mumbai
- Mumbai Local : दिवा प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! लवकरच Diva–CSMT थेट लोकल धावणार; रोजचा प्रवास होणार अधिक सोपा
Mumbai Local : दिवा प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! लवकरच Diva–CSMT थेट लोकल धावणार; रोजचा प्रवास होणार अधिक सोपा
Mumbai Local : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा ते CSMT लोकल सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. दिव्यात बुलेट ट्रेन स्थानक, टाटा कौशल्य विकास केंद्र आणि क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्यात येणार असल्याने दिवा शहराचा कायापालट होणार आहे.

दिवा प्रवाशांसाठी मोठी खुशखबर!
मुंबई : दिवा परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान थेट लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरच प्रत्यक्षात येणार असून, यामुळे रोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ, त्रास आणि गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मोठी घोषणा
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिव्यात आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिवा ते CSMT थेट लोकल सेवेसह बुलेट ट्रेनचे स्थानकही दिव्यातील माथर्डी परिसरात प्रस्तावित आहे, त्यामुळे दिवा शहराचा झपाट्याने कायापालट होत आहे.
दिवा रेल्वे स्थानकात मोठे बदल
डॉ. शिंदे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी दिवा हे गावासारखे होते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि रेल्वे स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय होती. मात्र आज
दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला आहे
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत
स्टेशन परिसर अधिक आधुनिक बनवण्यात आला आहे
शिक्षण, आरोग्य आणि विकासावर भर
दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने
चांगल्या शाळा
महाविद्यालये
रुग्णालये
वैद्यकीय महाविद्यालय
यांसारख्या सुविधांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात दिव्यात वैद्यकीय महाविद्यालयासारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रोजगारासाठी नवी संधी
स्थानिक तरुणांसाठी मोठी बातमी म्हणजे,
कल्याण रोड परिसरात टाटा कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून
पुढील 6 ते 7 महिन्यांत हे केंद्र सुरू होणार आहे
यामुळे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. तसेच दिव्यात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्लस्टर पुनर्विकासातून मोफत मोठी घरे
क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की,
धोकादायक व अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना
अधिकृत, सुरक्षित आणि मोठे हक्काचे घर विनामूल्य दिले जाणार आहे
ठाणे शहरात सध्या 13 क्लस्टर प्रकल्प एकाचवेळी सुरू असून,
दिवा शहरातील 95% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे
लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे
दिव्यासाठी सुवर्णकाळाची सुरुवात
थेट लोकल सेवा, बुलेट ट्रेन स्थानक, रोजगार केंद्रे आणि क्लस्टर पुनर्विकास यामुळे दिवा शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, येत्या काळात दिवा हा ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा विकासकेंद्र ठरणार आहे.

